उंदरांना पळण्याच्या जबरदस्त अशा या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. कित्येकांना उंदरांना मारायचं नसतं पण त्यांना घरातून बाहेर काढायचं असतं किंवा उंदीर घरात मेला तर त्याची खूप दुर्गंधी येते. त्यामुळे उंदरांना न मारता त्यांच्यापासून मुक्ती मिळण्याचा हा उपाय आहे.
Kitchen Jugaad Video : रेशनचे तांदूळ तेलात टाकून तर बघा, कमालच झाली
advertisement
उंदरांना न मारता घरातून बाहेर पळवण्यासाठी उंदरांना सगळ्यात आधी आकर्षित करायचं आहे. यासाठी गव्हाचं पीठ घ्या, साखर आणि तूप घ्या. पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्या. याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल उंदरांना तर असे खाद्यपदार्थांचे वास आवडतात मग ते पळण्याऐवजी उलट अधिकच घरात येतील. तर तसं नाही. याचं कारण म्हणजे त्या पीठातील मिश्रण.
एका वाटीत डिटर्जंट पावडर आणि फिनाईलच्या गोळीची पूड करून घ्यायची आहे. एकत्र करून, ही पावडर गोळ्यांच्या वाट्या करून त्यात थोडी थोडी भरून पुन्हा गोळे करून घ्यायची आहे.
आता हे गोळे घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. जिथं उंदीर असण्याची शक्यता आहे. याच्या वासामुळे न मारता उंदीर घरातून पळतील. ते पुन्हा तुमच्या घरातच येणार नाहीच. उलट घराचा रस्ता विसरतील असा दावा या महिलेने केला आहे.
Kitchen Jugaad Video : वापरलेली फुलं कचऱ्यात फेकू नका, गरम तव्यावर टाका, मोठा फायदा