आजवर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने झुरळं पळवली असाल, पण तेलाने तुम्ही झुरळांना पळवून लावलं आहे का? तेलाने झुरळं पळवायची, कशी काय? वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. एका महिलेने हा जुगाड दाखवला आहे. आता हे कसं आणि काय करायचं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
यासाठी तुम्ही 2 चमचे तेल घ्या. खोबरेल तेल, मोहरीचं तेल किंवा कोणतंही खाद्यतेल घ्या. तुम्ही तळणीसाठी वापरलेलं शिल्लक राहिलेलं तेलही वापरू शकता. तेलात 4 चमचे गव्हाचं पीठ घ्या. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही दुसरं तांदूळ, ज्वारी, बाजरी, बेसन असं कोणतंही पीठ घेऊ शकता. पण गव्हाचं पीठ थोडं चिकट असतं, त्यामुळे ते घेणं उत्तम. यात आता अडीच चमचे बोरीक पावडर टाका. नंतर डांबर गोळीची पूड करून टाका. यासाठी खलबत्ता वापरू नका कारण ती विषारी असते. दगड घेऊन पूड करा. या मिश्रणात गूळ किंवा साखर टाकून हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या.
advertisement
Kitchen Jugaad Video : पाण्यात फक्त हे टाकून ठेवा, आयुष्यभर घरात दिसणार नाही एकही झुरळ
आता इथं आपण तेल वापरलं पाणी नाही याचं कारण म्हणजे पाणी लगेच चुकून जाईल, पण तेलामुळे ओलसरपणा टिकून राहिल. आता याने झुरळं कशी पळतील किंवा पळवायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे मिश्रण तुम्ही दोन पद्धतीने वापरू शकता. एक म्हणजे कागदाचे छोटे तुकडे करून त्यावर पेस्ट लावून घ्या. दुसरं म्हणजे कापसाचे छोटे बोळे करून एका बाजूने मिश्रणात बुडवा दुसरी बाजू कोरडीच ठेवा. जिथं जिथं झुरळं दिसतात तिथं हे कापसाचे बोळे ठेवाल.
लगेच नाही पण हळूहळू तुम्हाला परिणाम दिसेल. यामुळे झुरळं 100% गायब होतील असा दावा महिलेने केला आहे. तसंच एका रात्रीत झुरळं गायब होतील. पुढची 10 वर्षे दिसणार नाहीत, असा दावा महिलेने व्हिडीओ पोस्ट करताना त्यावर केला आहे. युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
Kitchen Jugaad Video : प्लॅस्टिक पिशवीने कपडे धुण्याची पद्धत, धोबीलाही माहिती नाही हे सीक्रेट
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीने फक्त माहितीसाठी दिला आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)