आजवर तुम्ही लाटणीचा वापर चपाती लाटण्यासाठी केला आहे. पण लाटण्याने लसूणही सोलता येऊ शकते, याचा तुम्ही कधी विचार केला होता का? तीसुद्धा 400 ग्रॅम लसूण फक्त 10 मिनिटात... शक्यच नाही, असंच तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य करून दाखवली आहे ती एका महिलेने. तिने 400 ग्रॅम लसूण लाटण्याने 10 मिनिटात सोलून दाखवली आहे. आता ते कसं? हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
Kitchen Jugaad Video : फक्त पाण्याने मिळवा डास आणि झुरळांपासून सुटका, 10 वर्षे घरात दिसणारच नाहीत
यासाठी तुम्हाला लागणार आहे लाटणं आणि पिशवी. महिलेने व्हिडीओत दाखवल्यानुसार लसूण पिशवीत टाकायचं, पिशवीचं तोंड बंद करायचं. नंतर लाटणं पिशवीवर मारा पिशवी फिरत त्यावर लाटणं हलक्या हाताने मारत जा. आता लसूण पिशवीतून लसूण बाहेर काढा. तुम्ही पाहाल तर लसणीच्या कांड्या वेगळ्या होतात. तसंच काही लसणींच्या सालीही वेगळ्या झालेल्या दिसतील. ज्यांच्या साली निघाल्या नाहीत त्यांच्या साली सैल होतात, ज्या हातांनी काढणं अधिक सोपं होतं. लाटणीने मारल्याने काही लसणी चिरडल्याही जातील त्या वेगळ्या काढा आणि लगेच वापरा. म्हणजे त्या खराब होऊन वाया जाणार नाहीत.
Kitchen Jugaad Video : बटाट्याला छेद करून त्यात एक गोष्ट टाका, 5 वर्षे उंदीर घरात दिसणार नाही
एकाच वेळेत सगळ्या लसणीच्या साली वेगळ्या होणार नाही. त्यामुळे त्या लसूण वेचून पुन्हा पिशवीत टाकून त्याच पद्धतीने लाटणीने पिशवीवर मारा आणि नंतर बाहेर काढून त्यातील कचरा वेगळा करा. यावेळी हलक्या हाताने मारायचं आहे. कारण लसूण पाकळ्या वेगळ्या झालेल्या आहेत त्यामुळे लसूण ठेचल्या जाऊ शकतात.
दररोज थोडी लसूण सोलायची असेल तर ठिक आहे. पण भरपूर लसूण सोलायचा असला तर मात्र हे छोटंस कामही भारी वाटतं. आता 400 ग्रॅम लसूण सोलायचं म्हटलं की एक-दीड तास जाईल. नखंही दुखू लागतील. पण महिलेने लाटण्याच्या मदतीने 400 ग्रॅम लसूण 10 मिनिटांत सोलल्याचा दावा केला आहे.
Sita cha Swayampak या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीने जो फक्ता माहितासाठी दिला आहे.)