TRENDING:

Kitchen Jugaad Video : किचनमधील भांडी ठेवा फक्त एका बाटलीत

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : घर किंवा किचन लहान असेल तर भांडी कुठे ठेवायचा हा प्रश्न असतो. पण काही भांडी तुम्ही प्लॅस्टिक बाटलीत ठेवू शकता. यामुळे भांड्यांना जागाही कमी लागेल. आता ते कसं काय?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : प्लॅस्टिक बाटलीत आपण काय ठेवतो, पाणी, कोल्डड्रिंक, तेल, ज्युस किंवा इतर कोणताही द्रव पदार्थ. पण तुम्ही प्लॅस्टिक बाटलीत कधी भांडी ठेवली आहेत का? प्लॅस्टिक बाटलीत आणि भांडी... कशी काय राहतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण विचित्र वाटणाऱ्या या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

पाणी, कोल्डड्रिंक, ज्युसच्या प्लॅस्टिक बाटली तर आपण रिकामी झाली की सहज फेकून देतो. पण याचा अनोखा असा वापर जो आज तुम्ही पाहिला तर प्लॅस्टिक बाटली कधी फेकणार नाही. कारण हीच प्लॅस्टिक बाटली तुमच्या किचनमधील भांड्याचा पसारा कमी करण्यात तुम्हाला मदत करेल. घर किंवा किचन लहान असेल तर भांडी कुठे ठेवायचा हा प्रश्न असतो. पण काही भांडी तुम्ही प्लॅस्टिक बाटलीत ठेवू शकता. यामुळे भांड्यांना जागाही कमी लागेल. आता ते कसं काय?

advertisement

Kitchen Jugaad Video : एका लाटण्याची कमाल, तब्बल 400 ग्रॅम लसूण फक्त 10 मिनिटांत सोला

व्हिडीओत दाखवल्यानुसार प्लॅस्टिक बाटली झाकणाच्या भागाकडून थोड्या खाली भागावर कापा. त्यानंतर बाटलीला मधेच कट द्या. आता या बाटलीत तुम्ही कप ठेवू शकता. कप बाटलीत भरल्यानंतर बाटलीचा वरचा कापलेला भाग पुन्हा लावून टाका. तुम्ही पाहू शकता बाटलीत सुरक्षितरित्या हे कप एका कोपऱ्यात राहतील. कप हे असं भांडं आहे जे कुठे ना कुठे पडून आपल्या हातून निसटून फुटतंच. कपचा थोडा जरी भाग फुटला की तो कप वाया गेला. पण प्लॅस्टिक बाटलीत अशा पद्धतीने कप ठेवल्याने ते फुटणार नाहीत.

advertisement

दुसरं म्हणजे बाटलीचा वरचा झाकणाकडील भाग कापा. त्यानंतर बाटलीला वरच्या बाजूने आणि तळाशी व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे छिद्र करून घ्या. बाटलीच्या वरच्या बाजूला केलेल्या छिद्रातून दोरी बांधून घ्या. आता ही बाटली किचन सिंक जिथं तुम्ही भांडी घासता तिथं लटकवा. याचा उपयोग काय? तर जेव्हा तुम्ही चमचे, चाकू, सुरी धुवाल तेव्हा ते यामध्ये टाका. ही भांडी धुतल्यानंतर आपण कशीही ठेवतो आणि मग हवी तेव्हा त्यावेळेला ती आपल्याला सापडत नाहीत. पण अशा पद्धतीने ठेवल्याने ती सहज सापडतील आणि या चमचा सुऱ्यांचा किचनवर पसाराही होणार नाही.

advertisement

Kitchen Jugaad Video : फक्त पाण्याने मिळवा डास आणि झुरळांपासून सुटका, 10 वर्षे घरात दिसणारच नाहीत

युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : किचनमधील भांडी ठेवा फक्त एका बाटलीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल