सिलेंडर रिकामा झाल्यावर त्यावर भांडं ठेवण्याच्या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. खरंतर याचा खूप मोठा फायदा आहे. आता सिलेंडरवर भांडं का ठेवायचं, त्याचा काय फायदा आहे, हे या व्हिडीओत एका गृहिणीनं दाखवलं आहे. आता नेमकं काय ते आपण पाहुयात.
Jugaad Video : काटा चमच्यानेच स्वच्छ होतील; भांडी घासण्याची नवी पद्धत एकदा पाहाच
advertisement
व्हिडीओत पाहाल तर महिलेनं रिकाम्या झालेल्या सिलेंडवर एक भांडं उलटं ठेवलं आहे. अशा पद्धतीने राहणारं कोणतंही भांडं तुम्ही इथं वापरू शकता.
पाहायला हे क्षुल्लक वाटेल पण या उपायाचा फायदा मोठा आहे. असा की एकदा का तुम्हाला समजला की तुम्हीसुद्धा हा उपाय नेहमी कराल. आता हा फायदा काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
Jugaad Video : स्विचबोर्डला कांदा-टोमॅटो लावताच झाली कमाल, पाहताच तुम्हीही कराल उपाय
Didi ye kaise karu युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)