Ankitanoop या युट्यूब चॅनेलवर कोबी कापण्याची नवी ट्रिक शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणे कोबी कापताना हाताच्या बोटांना इजा होण्याची शक्यता असते. तेव्हा तुम्ही प्लास्टिकची बॉटल घेऊन ती व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे आयताकृती कापून घ्या. मग मोठ्या आकाराची सेफ्टी पिन त्या प्लास्टिकच्या तुकड्यावर लावा आणि सेफ्टी पिनमध्ये बोट अडकवून कोबी कापायला सुरुवात करा.
advertisement
Kitchen Tips : शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बनवा यम्मी केक, सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
सेफ्टी पिनच्या ट्रिकचा वापर करून तुम्ही कोबी हवी तशी बारीक चिरू शकता. यामुळे कोबी चिरताना तुम्हाला इजा होणार नाही आणि कोबी सुद्धा पटापट चिरून पूर्ण होईल. ट्रिक वापरताना लक्षात घ्या की वापरण्यात येणारा प्लास्टिकचा तुकडा स्वच्छ असावा तसेच सेफ्टी पिनला जंग लागलेली नसावी. या ट्रिकसाठी मध्यम किंवा लहान आकाराच्या सेफ्टी पिन उपयोगी ठरणार नाहीत तेव्हा फक्त मोठ्या आकाराच्या सेफ्टी पिनचा वापर करावा.
कोबी सह इतर भाज्या कापण्यासाठी बाजारात अनेक टूल्स उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. परंतु व्हिडीओमध्ये दाखवलेल्या ट्रिकनुसार तुम्ही घरगुती साहित्यांचा वापर करून सोप्या पद्धतीने कोबी कापू शकता.