TRENDING:

Kitchen Jugaad - बटाट्याचा असा वापर तुम्हाला माहितीच नसेल, वाचवू शकतो तुमची वीज; कसं ते पाहा Video

Last Updated:

बटाट्याचा या अनोख्या फायद्याचा किचन जुगाड एका गृहिणीने शेअर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : आतापर्यंत तुम्ही बटाट्यापासून बरेच पदार्थ बनवले असतील. बटाट्याचा घरगुती सौंदर्य उपाय म्हणूनही वापर केला असेल. पण हाच बटाटा तुमचं लाइट बिल कमी करू शकतो, याचा तुम्ही कधी विचारही केला होता का? हो... बटाटा तुमची वीज बचत करू शकता. बटाट्याचा या अनोख्या फायद्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बटाट्याचा हा जबरदस्त असा किचन जुगाड आहे.
किचन जुगाड
किचन जुगाड
advertisement

बटाटा एका विशिष्ट पद्धतीने वापरल्यास तुमचं लाइट बिल कमी होईल. एका गृहिणीने या जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणीने सोशल मीडियावर ते इतरांसाठी शेअर करतात. अशाच गृहिणीने शेअर केलेला हा बटाट्याचा वापर करून वीज बचत करण्याचा जुगाड. पण आता हे कसं शक्य आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.

advertisement

Kitchen Jugaad Video - फुगा झटपट सोलून देईल तुमची लसूण; इथं पाहा सर्वात सोपी पद्धत

आता तुम्हाला करायचं काय आहे. तर हा बटाटा तुम्हाला फ्रिजमध्ये वापरायचा आहे.

बटाटा कापून तो फ्रिजरमध्ये चोळून घ्या. यामुळे एरवी फ्रिजमध्ये साचत असलेला बर्फ साचणार नाही. दोन दिवसातून एकदा हा उपाय करा, असा सल्ला या महिलेने दिला आहे. यामुळे वीज बिल कमी होतं, असा दावा या महिलेने व्हिडीओत केला आहे.

advertisement

Creator Search 2.0 युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Kitchen Jugaad : फ्रिजला लावा टॉयलेट क्लिनर, लाइट बिल कमी होईल; कसं ते पाहा VIDEO

तुम्ही असे कोणते जुगाड करता त्याबाबतही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये माहिती नक्की द्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

(सूचना - हा लेख व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad - बटाट्याचा असा वापर तुम्हाला माहितीच नसेल, वाचवू शकतो तुमची वीज; कसं ते पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल