advertisement

Kitchen Jugaad Video - फुगा झटपट सोलून देईल तुमची लसूण; इथं पाहा सर्वात सोपी पद्धत

Last Updated:

लसूण सोलण्याची सोपी पद्धत एका गृहिणीने दाखवली आहे.

किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : स्वयंपाक करताना सर्वात कंटाळवाणं आणि वेळ लागणारं काम कोणतं विचारलं तर कुणीही सांगेल ते म्हणजे लसूण सोलण्याचं. लसणीच्या कांद्यापासून एकएक पाकळी वेगळी करून त्याची साल काढणं म्हणजे खूपच त्रासदायक. लसूण सोलण्यात वेळही जातो आणि कंटाळाही येतो. पण फुग्यामुळे तुमचं हे मिनिटांचं काम अवघ्या काही तासात होईल. जबरदस्त असा किचन जुगाड आहे.
लसूण सोलण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. पण फुग्या ने तुम्ही कधी लसूण सोलून पाहिला आहे का? आता फुग्या ने लसूण कशी सोलाय ची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एका गृहिणीने ही जबरदस्त अशी ट्रिक दाखवली आहे.
advertisement
सुरुवातीला लसणीच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्या. आता एक फुगा घ्या. त्याचं पुढचं थोडं टोक कापा. आता या फुग्यात जितकी मावेल तितकी लसूण ठेवा. फुग्याचं पुढचं टोक एका हाताने दाबून घ्या. फुगा जमिनीवर ठेवून दुसर्‍या हाताने घासा. फक्त 2-3 वेळा फुगा जमिनीवर फिरवून घ्या.
आता तुम्ही फुग्यातली लसूण काढून पाहा. लसणीच्या सर्व साली निघालेल्या तुम्ही पाहाल. आता निघालेल्या सालीतून लसूण वेगळी करा.
advertisement
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - फुगा झटपट सोलून देईल तुमची लसूण; इथं पाहा सर्वात सोपी पद्धत
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement