advertisement

Kitchen Jugaad Video : घरात एक्स्ट्रा गॅस सिलेंडर ठेवण्याची झंझटच संपली; करा हा जबरदस्त जुगाड

Last Updated:

एका गृहिणीने गॅस सिलेंडरचा हा जबरदस्त असा जुगाड दाखवला आहे.

किचन जुगाड
किचन जुगाड
नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : अचानक गॅस सिलेंडर संपला की गृहिणींची तारांबळ उडते. त्यामुळे बरेच लोक दोन गॅस सिलेंडर ठेवतात. एक संपला की दुसरा वापरता येतो. पण मग घर किंवा किचन लहान असलं, जागा कमी असली की हा एक्स्ट्रा सिलेंडर ठेवायचा कुठे असा प्रश्न पडतो. आता या एक्स्ट्रा सिलेंडरसाठी जबरदस्त असा किचन जुगाड आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
गॅस सिलेंडर भरलेला असो वा रिकामा घरात ठेवल्यावर जागा अडतेच, शिवाय इथे तिथे ठेवून घराची शोभाही जाते. पण आता आम्ही तुम्हाला जो किचन जुगाड दाखवणार आहोत त्यामुळे सिलेंडर ठेवलेल्या जागेची शोभा वाढणार आहे आणि अडलेल्या जागेचाही वापर करता येणार आहे.
advertisement
तुम्हाला यासाठी तुमचा एखादा जुना गाऊन लागेल. एरवी तुम्ही तो चिंधी वाला, भांडीवाल्याला देत असाल किंवा त्याचं पाय पुसणं करत असाल. पण आता त्याचा असा वापर करुन पाहा.
यासाठी गाऊन कापण्याची, शिवण्याची गरज नाही.  तुम्हाला करायचं काय आहे. तर गाऊन उलटा करा आणि त्याच्या मानेकडील भागाला गाठ मारा. आता तो सरळ करा. जिथून खुला भाग आहे तिथून हा गाऊन सिलेंडरवर घाला. आता या सिलेंडरवर एखादा जुना ट्रे ठेवून त्यावर एखादं छोटं शोभेचं झाड ठेवा.
advertisement
काय मग आहे की नाही ही जबरदस्त आयडिया.
Creator Search 2.0 युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : घरात एक्स्ट्रा गॅस सिलेंडर ठेवण्याची झंझटच संपली; करा हा जबरदस्त जुगाड
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement