advertisement

Kitchen Jugaad Video : घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये पैसे जरूर ठेवा; फायद्याचा उपाय

Last Updated:

फ्रिजमध्ये पैसे ठेवण्याच्या उपायाचा फायदाही मोठा आहे.

किचन जुगाड (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : बँक किंवा कपाट, पाकिट, गल्ला ही पैसे ठेवण्याची जागा. पण याशिवाय फ्रिजमध्येही एकदा पैसे ठेवून पाहा. फ्रिजमध्ये पैस ठेवण्याचा एक फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. फ्रिजमध्ये इतर सामानांसोबत पैसेही ठेवा. आता याचा काय फायदा होतो ते आपण व्हिडीओमध्ये पाहुयात.
फ्रीजमध्ये आपण लवकर खराब होतात अशा वस्तू ठेवतो. यात भाजी, दूध अशा वस्तूंचा समावेश आहे. पण फ्रीजमध्ये पैसे ठेवणंही फायदेशीर आहे. हे एका गृहिणीने दाखवलं आहे. विशेषत: घराबाहेर जाताना तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुम्हाला फ्रीजरमध्ये एका वाटीत पाणी भरून ठेवायचं आहे. पाण्याचा बर्फ जमवून घ्यायचा आहे. यात पैशांची नाणी ठेवायची आहेत. आता या नाण्याचा उपयोग काय? तर जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाता त्यावेळी लाइट गेली की फ्रीजमधील वस्तू खराब होण्याचा धोका असतो. तुम्ही घरी येईपर्यंत कदाचित लाइट आलेली असते. लाइट गेली होती ते तुम्हाला समजत नाही. सर्व पदार्थ फ्रीजच्या तापमानाला आआलेले असतात. त्यामुळे खराब होऊनही ते समजत नाही.
advertisement
अश्विनी तुम्ही बाहेरून आल्यावर फ्रीज मधील वाटीतील नाणं पाहा. वाटीतील पाणी वितळून नाणं खाली गेलं असेल तर याचा अर्थ लाइट गेली होती. यामुळे कोणते पदार्थ खराब झाले नाहीत ना हे चेक करून घ्या.
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये पैसे जरूर ठेवा; फायद्याचा उपाय
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement