advertisement

Kitchen Jugaad : झोपण्याआधी बेडवर चहाची गाळणी फिरवा; फायदा काय VIDEO मध्ये पाहा

Last Updated:

चहाच्या गाळणीचा बेडवर असा वापर करून पाहा.

किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : चहाची गाळणी आपण चहा गाळण्यासाठी वापरतो. याशिवाय या गाळणीचा दुसरा काही वापर करत नाही. पण हीच चहाची गाळणी तुम्हाला आणखी एका कामासाठी उपयोगी पडेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण चहाची गाळणी तुम्ही झोपण्याआधी बेडवर फिरवायला हवी. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. अशाच गृहिणीने शेअर केलेला हा किचन जुगाड. ज्यात तिने बेडवर चहाच्या गाळणीचा वापर करून एक उपाय सांगितला आहे.
तुम्हाला करायचं काय आहे तर गाळणीत बेकिंग सोडा घेऊन तो गादीवर चाळून पसरवून घ्यायचा आहे. 10 मिनिटं तो गादीवर तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर एक प्लेट घेऊन ती एका कपड्यावर उलटी ठेवा. कपड्याची चारही टोकं एकत्र करून त्याला रबर बांधा. ही प्लेट तुम्हाला इस्त्री सारखी गादीवर फिरवायची आहे. यामुळे गादीवरील बेकिंग सोडा स्वच्छ होईल. यानंतर याच कपड्यावर थोडं पाणी शिंपडून पुन्हा त्याच पद्धतीने गादीवर फिरवा. यावेळी पंखा चालू ठेवा. जेणेकरून गादी सुकेल.
advertisement
याचा फायदा काय तर यामुळे तुमची गादी स्वच्छ होईल. त्यातील दमटपणा जाईल. वास येणार नाही. यामुळे तुम्हाला होणारं फंगस इन्फेक्शन, त्वचेची समस्याही होणार नाही जी या खराब गादीमुळे होते.
advertisement
Creator Search 2.0 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad : झोपण्याआधी बेडवर चहाची गाळणी फिरवा; फायदा काय VIDEO मध्ये पाहा
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement