Kitchen Tips : किचन सिंक चिकट आणि घाण झालंय? या 4 सोप्या टिप्स वापरून काही मिनिटांत होईल स्वच्छ!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
भांडी धुतल्यानंतर स्वयंपाकघरातील सिंक अस्वच्छ राहिल्यास त्यावर घाण आणि चिकटसर जाड थर साचतो. त्यानंतर हे स्वच्छ करणे थोडे कठीण होते. मात्र तुम्ही फक्त चार गोष्टी वापरून हे सिंक काही मिनिटांत चमकवू शकता.
मुंबई, 27 ऑगस्ट : स्वयंपाकघरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवते. स्वयंपाकघर ही अशी जागा आहे जिथे तुम्ही रोजचा स्वयंपाक करता, भांडी घासत असता, अन्नपदार्थ स्वयंपाकघराच्या स्लॅबवर, सिंकवर, गॅसच्या शेगडीवर सतत अन्नाचे कण किंवा काहीतरी पडत राहते. अशा वेळी स्वयंपाकघराची रोजची साफसफाई योग्य प्रकारे केली नाही तर जंतू वाढू शकतात. सिंक ही एक अशी जागा आहे जिथे ओलाव्यामुळे जंतूंना वाढण्याची पुरेशी संधी मिळते.
अनेकदा काही लोकांच्या स्वयंपाकघरातील सिंक चिकट, घाण दिसते. त्यात पाणी राहते, अन्नाचे कण सिंक आणि पाईपमध्ये अडकतात. यामुळे बॅक्टेरिया आणि जंतूंना वाढण्याची पुरेशी संधी मिळते. आपण दररोज सिंक साफ न केल्यास आजारी पडण्याचा धोका वाढतो. सिंकमध्ये पडलेल्या खरकट्या भांड्यांमध्ये हट्टी जंतू आढळतात. ते नीट स्वच्छ न केल्यास अन्नातून विषबाधा, जुलाब, पोटदुखी असे आजार होऊ शकतात. किचन सिंक साफ करण्याचे अगदी सोपे उपाय आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
advertisement
स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्याचे सोपे मार्ग
बेकिंग सोडा : खाण्याची भांडी दररोज सिंकमध्ये जातात. अशा परिस्थितीत ते देखील दररोज स्वच्छ केले पाहिजे. सिंक चमकण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. पाण्यात बेकिंग सोडा टाकून सिंक स्वच्छ करा. तुम्ही थेट बेकिंग सोडा संपूर्ण सिंकवर पसरवा आणि ब्रशने सिंक घासून घ्या. नंतर पाण्याने स्वच्छ करा. सिंकवरील घाण आणि ग्रीस निघून जाईल आणि किचन सिंक काही मिनिटांत चमकेल. बेकिंग सोडामध्ये असलेल्या घटकामध्ये घाण, चिकटपणा साफ करण्याची क्षमता असते.
advertisement
ऑलिव्ह ऑईलने : जर तुमचे स्वयंपाकघरातील सिंक स्टीलचे असेल तर तुम्ही ते स्वच्छ करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. स्पंज किंवा कापडावर थोडे ऑलिव्ह तेल लावा आणि सिंकला घासून घ्या. आता एका स्प्रे बाटलीत गरम पाणी टाका आणि त्यावर शिंपडा आणि स्वच्छ करा. सिंक नवीन सारखे दिसेल.
डिश वॉशिंग लिक्विड : जर किचन सिंक खूप घाणेरडे झाले असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी आता एक चमचा डिश साबण घाला आणि स्पंजने स्क्रब करा. सिंक टॅप चालू करा आणि पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. सिंक पूर्णपणे स्वच्छ आणि जंतूमुक्त होईल.
advertisement
व्हिनेगर : व्हाईट व्हिनेगरचा वापर किचन हॅकमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. याच्या मदतीने तुम्ही सिंक साफ करू शकता. तुम्ही प्रथम सिंकमध्ये थोडासा बेकिंग सोडा आणि नंतर व्हिनेगर घाला. स्पंजच्या मदतीने ते स्क्रब करा. हे दोघे मिळून रासायनिक अभिक्रिया करतात, ज्यामुळे किचन सिंकवर साचलेली घाण आणि ग्रीस साफ होईल.
नियमितपणे सिंक स्वच्छ करा : एक दिवस स्वच्छ केल्यावर किचन सिंक स्वच्छ राहील असे नाही. जेव्हा तुम्ही भांडी स्वच्छ कराल त्यानंतर येथे सांगितलेल्या उपायांनी ते स्वच्छ करा. कारण आपण नियमितपणे सिंक साफ करत राहिल्यास कधीकधी ते फक्त कोमट पाण्याने देखील स्वच्छ होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 27, 2023 10:05 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : किचन सिंक चिकट आणि घाण झालंय? या 4 सोप्या टिप्स वापरून काही मिनिटांत होईल स्वच्छ!







