आता एसीच्या रिमोटवर चपातीचं पीठ फिरवल्याने काय होईल, त्याचा काय फायदा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, महिला चपातीचं मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा घेते आणि तो रिमोटवर फिरवते. संपूर्ण रिमोटवरून तो ती हा गोळा फिरवून घेते.
Summer Tips : फ्रिजमध्ये न्यूजपेपर ठेवताच झाली कमाल; जबरदस्त Kitchen Jugaad Video
advertisement
महिलेने व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार यामुळे रिमोट स्वच्छ होतो. हा रिमोट इथं, तिथं पडलेला असतो. कित्येकांचे हात त्याला लागलेले असतात. तुम्हीही तुमचा रिमोट पाहिला असेल तर त्यावर तुम्हाला डाग दिसतील. रिमोटला कव्हर जरी घातलेलं असेल तर त्यात थोडीतरी धूळ तुम्हाला दिसेल. रिमोट कितीही पुसून स्वच्छ केला तरी त्याच्या कोपऱ्यात, बटणांमध्ये साचलेली घाण मात्र जात नाही. पण या उपायामुळे तुमच्या रिमोटचा प्रत्येक कोपरा स्वच्छ होईल. पीठ चिकट असल्याने रिमोटवरील सर्व धूळ त्याला चिकटून येईल.
Kitchen Jugaad Video : फ्रिजला टॉयलेट क्लिनर नक्की लावा; उन्हाळ्यात वीज वाचवण्याचा जबरदस्त जुगाड
Shreya's creative corner यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा उपाय फक्त एसीच्या रिमोटपुरता नाही तर तुम्ही टीव्ही किंवा इतर उपकरणांच्या रिमोटवरही करू शकता.
तुम्ही हा उपाय एकदा करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.