तेलात टुथपेस्ट टाकणं... वाचूनच तुम्हाला विचित्र वाटलं असेल. पण याचा परिणाम तितकाच आश्चर्यकारक आहे. तेलात टुथपेस्ट टाकल्याने काय होतं, हे का एकदा तुम्ही पाहिलं तर तुम्हीही चकीत व्हाल. किंबहुना हा विचित्र वाटणारा जुगाड तुम्ही नेहमी कराल. आता नेमकं तेलात टुथपेस्ट टाकल्याने काय होतं हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग व्हिडीओ पाहुयात.
advertisement
Kitchen Jugaad Video - गरम गरम तव्यावर ठेवा अंघोळीचा साबण; जादुई परिणाम
व्हिडीओत महिलेने दाखवल्यानुसार तिनं तेलाचे डाग असलेले कढई घेतली आहे. यात तिनं सुरुवातीला टुथपेस्ट टाकली. त्यानंतर त्यात मीठ टाकलं. महिलेनं सांगितल्यानुसार मीठ दाणेदार असतं आणि ते क्लिनिंगचं चांगलं काम करतं. आता एक अॅल्युमिनिअम फॉईल घेऊन त्याने मीठ आणि टुथपेस्ट एकत्र करायची आहे. ते मिक्स करतच अॅल्युमिनिअम फॉईलनं कढई घासायची आहे. कढईच्या मागेही असंच करा. आता कढई पाण्याने स्वच्छ धुवा. शेवटी परिणाम तुमच्या डोळ्यासमोर आहे.
बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की कढईत काही तळलं किंवा भाजीही बनवली तरी तेलाचे डाग राहतात. हे डाग कितीही घासले तरी सहजासहजी पटकन जात नाही. अशावेळी हा जुगाड कामी येईल. फक्त टुथपेस्ट, मीठ आणि फॉईल पेपरनं हा डाग काही सेकंदात गायब होतो.
Kitchen Jugaad Video - चहात साखरेऐवजी एकदा टाल्कम पावडर टाकून पाहा; फायदाच फायदा
Ankitanoopयुट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज लोकमत याची हमी देत नाही.)