भोपाळ, 15 नोव्हेंबर : पूजेदरम्यान आपण देवाची आरती करतो, देवाला कुंकवाचा टिळा लावतो. शिवाय स्वतःच्या कपाळावरही कुंकू लावून घेतो. मात्र ही टिळा लावण्याची परंपरा नेमकी का बरं पाळली जाते? त्यामागे असा काय महत्त्वाचा अर्थ आहे? पाहूया.
ज्योतिषी पंडित पुरुषोत्तम शर्मा यांनी सांगितलं की, टिळा हे देवांच्या आशीर्वादाचं प्रतीक असतं. कपाळावर टिळा लावणं अत्यंत शुभ आणि मंगलमय मानलं जातं. मग तो चंदनाचा असला, कुंकवाचा असला किंवा भस्माचा असला तरीही. खरंतर प्रत्येक टिळ्याचं वेगवेगळं महत्त्व आहे, शिवाय ते नेमकं कोणत्या बोटाने लावावं यालाही अर्थ आहे.
advertisement
हिरा परवडणार नाही, मग 'हा' रत्न करा खरेदी! भाग्याचा दरवाजा उघडेल
हिंदू धर्मात टिळ्याचे तीन प्रकार असतात. वैष्णव टिळा, शैव टिळा आणि शाक्त टिळा. भगवान विष्णूवर श्रद्धा ठेवणारे भाविक वैष्णव टिळा लावतात. महादेवाची पूजा करणारे भाविक शैव टिळा लावतात. तर, भगवती मातेचे भाविक टिकलीच्या रुपात शाक्त टिळा लावतात. खरंतर हिंदू धर्मात गळ्यावर, हृदयावर, हातांवर, पाठीवर, काखेत, इत्यादी शरिराच्या 12 भागांवर टिळा लावण्याची प्रथा आहे. या प्रत्येक टिळ्याला वेगवेगळा अर्थ असतो. विशेषतः कपाळावर टिळा लावल्यास शांतता मिळते, असं मानलं जातं.
महिन्याभरात दुसऱ्यांदा बदलणार बुध चाल, 'या' राशीच्या व्यक्तींचं उत्पन्न वाढणार!
एखाद्या शुभ कार्यासाठी व्यक्ती बाहेर जात असेल तर तिला मधल्या बोटाने टिळा लावावा, असं शास्त्र सांगतं. त्यामुळे कार्य यशस्वी होतं. मान्यतेनुसार, मधल्या बोटाचा संबंध शनी ग्रहाशी असतो आणि शनी हा यशाचं प्रतीक आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g