त्यात मागच्या दोन चार वर्षांपासूनच नवरात्रीला गरबा खेळताना लोक मृत्यूमुखी पडले असल्याचे अनेक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात घडली.
खरगोनच्या भीकनगाव तालुक्यातील पलासी गावात रविवारी उशिरा रात्री दुर्गा पंडालात गरब्याचे आयोजन झाले होते. भक्तीगीतांसोबत काही चित्रपटांच्या गाण्यांवरही लोक नाचत होते, आनंद लूटत होते. याच कार्यक्रमात सोनम तरुणी आपला नवरा कृष्णपालसोबत गरबा खेळण्यासाठी आली होती.
advertisement
सोनमने फक्त 19 वर्षांची होती आणि नुकतंच तिचं लग्न झालं होतं. "मेरे ढोलनाआ" या गाण्यावर ती आपल्या नवऱ्यासोबत नृत्य करत होती. डान्सदरम्यान ती आपल्या पतीकडे बोट दाखवत गाण्याच्या ओळींवर आनंदाने मजा घेत होती. पण अचानकच तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. काही क्षणासाठी आजूबाजूच्या लोकांना काहीच कळले नाही.
अखेर नवरा कृष्णपाल तिला उचलायला धावला, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. डॉक्टरांना बोलावलं असता त्यांनी सोनमचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. प्राथमिक कारण हार्ट अटॅक असल्याचं समोर आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनम ही टेमला गावची रहिवासी होती. तिचं लग्न फक्त वर्षभरापूर्वी म्हणजे 1 मे रोजीच पलासी गावातील कृष्णपालसोबत झालं होतं. नवविवाहित म्हणून ती पहिल्यांदाच पतीसोबत पंडालात सहभागी झाली होती. पण दुर्दैवाने हा आनंदोत्सव तिच्या आयुष्याचा शेवट ठरला.
सोमवारी सकाळी कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिचे अंत्यसंस्कार पार पडले.