चित्रपटांमध्ये आपण अनेकदा अभिनेत्यांना पावसात छत्री पकडून नाट्यमय दृश्य साकारताना पाहतो, पण प्रत्यक्षात रेल्वे पटर्यांच्या जवळ तसे करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. आता तुम्ही विचार कराल की असं का? नक्की याने काय होतं? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
बहुतेक लोक सामान्यत: पटर्यांच्या जवळ उभे रहातात, तर काही लोक हातात छत्री घेऊन रेल्वे रुळ ओलांडतात. खरंतर लोकांना यात काही धोका आहे हे जाणवत नाही. ते फक्त वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रुळ क्रॉस करतात. पण आज आम्ही यामागचा धोका काय आहे हे सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्ही असं करत असाल तर सावध व्हाल.
advertisement
विद्युतसंचालित रेल्वे प्रणालीमध्ये ट्रेन्सला ओव्हरहेड लाईन्समधून 25,000 वोल्ट (25 kV) वीज मिळते. ही वीज ट्रेनच्या इंजिनपर्यंत पोहोचते आणि विशेष प्रणालीद्वारे जमिनीवर परत पाठवली जाते, ज्यामुळे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांना शॉक लागत नाही. यामुळे प्रवाशांसाठी सुरक्षितता राखली जाते. मात्र, पटर्यांच्या जवळ उपस्थित लोक किंवा वस्तूंशी ही वीज संपर्क साधू शकते, विशेषतः जर ते विद्युत चालक पदार्थ असतील तर, मग यात विचार करा की पावसात तु्म्ही धातूची छत्री हातात पकडली असेल तर मग ते विद्यूत वाहाक म्हणून काम करु शकते आणि त्यामुळे तुम्हाला शॉक बसेल.
या प्रकरणार छत्री थेट तारांना स्पर्श करत नसल तरी, “आर्किंग” प्रक्रियेमुळे वीज हवेतून धातूच्या छत्रीपर्यंत पोहोचू शकते. यामुळे अचानक जोराचा वीज झटका लागू शकतो, जो काही वेळा गंभीर किंवा मृत्यूदायी ठरू शकतो.
शिवाय रेल्वेचा हा शॉक इतका घातक असतो की तो लागल्यानंतर एखादा जिवंत राहिल याची शक्यताच कमी असते.
ओव्हरहेड लाईन्सच्या किती जवळ आहात यावर वीज झटक्याचा परिणाम अवलंबून असतो. छत्री जितकी जवळ असेल, धोका तितका अधिक. 25,000 वोल्टच्या लाईन्सवर, हलका झटका लगेच हृदयावर परिणाम करू शकतो, थोड्या अंतरावरही हलका झटका खूप जोराचा असतो, ज्यामुळे हालचाल करताना किंवा प्लेटफॉर्मवर असताना धोका अधिक वाढतो.
रेल्वे प्लेटफॉर्मवर थांबणे पटर्यांवर उभे राहण्यापेक्षा तुलनेने सुरक्षित आहे, पण तरीही ओव्हरहेड लाईन्सजवळ छत्री उंचावणे धोकादायक ठरते. जर छत्री चुकून तारांच्या खूप जवळ गेली, तर अचानक झटका लागू शकतो. म्हणून, प्लेटफॉर्मवर असताना सुद्धा छत्री उंच ठेवणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे.
भारतीय रेल्वे नियमितपणे या गोष्टींबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करते. केवळ छत्रीच नाही, तर धातूची काठी, डंडी, बांबूच्या काठी यांसारख्या वस्तूही ओव्हरहेड लाईन्सच्या जवळ घेऊन जाणे धोकादायक आहे. तसेच, पटर्यांवर चालणे कायदेशीरदृष्ट्या बंद आहे आणि अत्यंत धोकादायक आहे, तरीही काही लोक अद्यापही सावधगिरी बाळगत नाहीत.
रेल्वे पटर्यांवर चालताना किंवा लेव्हल क्रॉसिंग पार करताना छत्रीचा वापर कधीच करू नका. ओव्हरहेड लाईन्सच्या जवळ छत्री उंचावणे किंवा प्लेटफॉर्मवर धातूची छत्री ठेवणे टाळा. पटर्यांवर चालणे फक्त कायदेशीरदृष्ट्या बंद नाही, तर जीवावर देखील मोठा धोका निर्माण करू शकते. एक लहानशी गैरसोयही मोठ्या त्रासात बदलू शकते. सावधगिरी बाळगा आणि स्वतःची आणि इतरांची सुरक्षा सुनिश्चित करा.