TRENDING:

दोन बायका, एकच नवरा! 8 वर्षांपासून एकत्र, सगळं कसं सांभाळतो? स्वतःच केला खुलासा

Last Updated:

आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने जगाची पर्वा न करता आपलं आगळंवेगळं सत्य स्वीकारलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रेम, लग्न आणि संसार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती दोन व्यक्तींची जोडी. "दोघांचं तिसरं आणि घर होईल कसं बरं?" हे गाणं आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत. आपला समाज नात्यांना एका ठराविक चौकटीत पाहण्याचा सवयीचा झाला आहे. पण कधीकधी अशा काही कथा समोर येतात, ज्या समाजाच्या या चौकटीला थेट आव्हान देतात. अशा कथांना टीकेचा सामना करावा लागतो, पण त्यातील सत्य नाकारता येत नाही.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने जगाची पर्वा न करता आपलं आगळंवेगळं सत्य स्वीकारलं आहे. नायजेरियात राहणारा जेफ्री एनेई गेल्या 8 वर्षांपासून आपल्या दोन पत्नींसोबत एकाच घरात, अतिशय प्रेमाने राहतोय.

जेफ्री आणि त्याची पहिली पत्नी चिदिन्मा हे एखाद्या सामान्य जोडप्यासारखेच आयुष्य जगत होते. जेफ्री 33 वर्षांचा आणि चिदिन्मा 29 वर्षांची असताना त्यांच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली. जेफ्री आपल्या पत्नीसोबत मिळून एक फॅशन ब्रँड उभा करत होता. याच दरम्यान त्याची भेट 26 वर्षांच्या प्रेशियस नावाच्या एका फॅशन इन्फ्लुएन्सरशी झाली.

advertisement

जेफ्री आणि प्रेशियस एकमेकांच्या प्रेमात पडले. आजच्या काळात जिथे नात्यांमध्ये खोटेपणा भरलेला असतो, तिथे जेफ्रीने लपवाछपवी न करता सर्व काही आपल्या पत्नीला, चिदिन्माला स्पष्ट सांगितलं. त्याने कबूल केलं की त्याच्या मनात दुसऱ्या एका तरुणीबद्दलही भावना आहेत.

भारतात हिंदू विवाह कायदा 1955 नुसार, जोडीदार जिवंत असताना घटस्फोटाशिवाय दुसरं लग्न करणं हा गुन्हा आहे. पण ही कथा नायजेरियातील आहे. त्यामुळे तिथे या सर्व गोष्टींना तितकासा विरोध होत नाही. सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, जेव्हा जेफ्रीने प्रेशियसची ओळख चिदिन्माशी करून दिली, तेव्हा तिने कोणताही गोंधळ घातला नाही. उलट, त्या तिघांमध्ये एक मजबूत नातं तयार झालं. चिदिन्माला जेफ्री आणि प्रेशियसच्या नात्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती.

advertisement

मात्र, हे जितकं रोमँटिक वाटतं, तितकी ही वाट सोपी नव्हती. जेव्हा हे नातं सार्वजनिक झालं, तेव्हा जेफ्रीचं कुटुंब त्याच्यावर प्रचंड संतापलं.

जेफ्री सांगतो की, त्याच्या कुटुंबाने अजूनही या नात्याला स्वीकारलेलं नाही. "कदाचित ते मला कधीच पूर्णपणे स्वीकारणार नाहीत, पण काळानुसार त्यांना याची सवय होईल. जेव्हा त्यांना दिसेल की आमच्यात कोणताही 'स्कँडल' नसून खरं प्रेम आहे, तेव्हा त्यांचा राग मावळेल," असं जेफ्रीला वाटतं. इंटरनेटवरही या 'थ्रपल' (Thruple - तीन लोकांचे नाते) नात्यावर खूप टीका झाली, पण त्यांनी कोणाकडेही लक्ष दिलं नाही.

advertisement

तीन लोकांचा संसार कसा चालतो?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाचे दर तेजीत, डाळींब आणि आल्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

एकाच वेळी दोन जोडीदारांसोबत राहणं (Thruple) हे सामान्य नात्यापेक्षा जास्त आव्हानात्मक असतं, असं जेफ्री मान्य करतो. तो सांगतो, आमच्या नात्यात सत्याशी कोणतीही तडजोड केली जात नाही. तिघांनाही एकमेकांचे मानसिक पॅटर्न आणि भावनिक गरजा समजून घ्याव्या लागतात. या नात्यात पहिली पत्नी चिदिन्माची भूमिका सर्वात मोठी आहे. तिने प्रेशियसला स्वतःसारखीच जेफ्रीची पत्नी मानलं आहे. या तिघांनीही हे नातं आयुष्यभर निभावण्याचा निश्चय केला आहे. जगासाठी हे नातं विचित्र असलं, तरी त्यांच्यासाठी हेच त्यांचं 'हॅपी होम' आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
दोन बायका, एकच नवरा! 8 वर्षांपासून एकत्र, सगळं कसं सांभाळतो? स्वतःच केला खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल