व्हिडिओमध्ये 9 वर्षांची मुलगी तिची आई आणि पाच वर्षांच्या भावासोबत शाळेतून परतताना दिसत आहे. त्यांच्या बाजुने गायी आणि वासरु चालत आहे. अचानक गाई मागे फिरते आणि 9 वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला करते. तिला शिंगावर उचलून खाली आपटते. शिंगाने पायाने चिमुलीवर भयानक हल्ला करते. मुलीच्या आईच्या किंचाळण्यानं आजूबाजूचे लोक जमा होतात आणि गायीला तेथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत गाय मुलीवर सतत हल्ला करत असते.
advertisement
Viral News : व्यक्तीला विचित्र व्यसन; दिवसभर घेतो वास आणि त्याचाच लावतो परफ्युम
गायीला पळवून लावण्याचा स्थानिक लोक प्रयत्न करतात. अथक प्रयत्नानंतर त्यांना गायीला हाकलण्यात यश येतं. मुलीला डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यातं येतं. मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर आणि पुढील तपासानंतर गाईच्या 26 वर्षीय मालकाला अटक करण्यात आली आहे.
ही घटना तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या एमएमडीए कॉलनीतून समोर आली आहे. घराबाहेरील लावलेल्या सीसीटीव्हा कॅमेऱ्यामध्ये हा भयावह प्रकार कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नई कॉर्पोरेशनचे अतिरिक्त मुख्य सचिव आयुक्त, जे राधाकृष्णन यांनी मुलीची खाजगी रुग्णालयात भेट घेतली. राधाकृष्णन यांनी सांगितलं की, गायीच्या मालकाला 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बाळावर हल्ला करणाऱ्या गायीला आणि तिच्या वासराला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पेरांबूर येथील गोठ्यात ठेवलं आहे. गायीला कोणताही संसर्गजन्य रोग झाला आहे की नाही आणि हा हल्ला कोणत्या रोगामुळे झाला आहे का, याची खातरजमा केली जाईल.
