रतन टाटांच्या अंत्ययात्रेतील शंतनूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी शंतनू नायडूला अडवून त्यांची ओळख विचारत आहेत. गाडी का घेऊन जात आहेत याविषयी पोलीस चौकशी करताना दिसत आहेत. फुटेजमध्ये शंतनू अगदी शांतपणे सांगत आहेत की, अंत्ययात्रेमध्ये सामील होणार आहेत. पोलीस आणि शंतनू दोघांचेही लोक कौतुक करत आहेत. आपापल्या ड्युटीज चोखपणे करत असल्याविषयी लोकांना व्हिडिओवर भरपूर कमेंट केल्या आहेत.
advertisement
Ratan Tata: रेस्टॉरंटमध्ये भांडी धुतली ते टाटा समुहाचे अध्यक्ष, रतन टाटा यांचा संपूर्ण प्रवास
रतन टाटा यांच्या निधनाबद्दल नायडू यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली होती. त्यांनी लिहिले होते ''अलविदा, माझे लाइटहाऊस''. रतन टाटांच्या शंतनू खूप जवळ होते. रतन टाटांच्या वाढदिवशीचा त्यांचा वाढदिवस साजरा करताना शंतनू त्यांच्यासोबत दिसला होता. तो व्हिडिओही सोशल मीडियावर भरपूर चर्चेत आला होता.
दरम्यान, 29 वर्षीय शंतनूला रतन टाटांनी 2022 मध्ये कामावर घेतले होते. टाटा ट्रस्टमधील कामाशिवाय ते त्यांच्या युनिक आणि चांगल्या आयडियांसाठी ओळखले जातात. शंतनू गुडफेलो स्टार्टअपचा मालक देखील आहे. ही कंपनी ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य पुरवते.