आपल्याला तर हे माहित आहे की पाण्यातील दुनिया ही वेगळीच आहे. खोल समुद्रात तर अशा गोष्टी आणि जीव लपलेले आहेत की काहींबद्दल तर आपल्याला माहिती देखील नाही. तर काही पाहूनच विचित्र वाटतात.
खेळण्यासाठी कोणीच नाही, मग कुत्र्याने स्वत:च केला प्लान; क्युट Video पाहून नेटकऱ्यांनाही होतोय आनंद
तुम्ही नदी, तलाव किंवा विहिरीत मासे पोहताना अनेकदा पाहिले असेल. काही मासे इतके सुंदर असतात की ते आपल्याला आकर्षित करतात. अशाच एका माशाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हा मासा तुमच्याकडे बघून हसताना दिसत आहे.
advertisement
व्हिडीओ सुरू होताच समोर काही मासे दिसत असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्यांच्या तोंडाचा आकार अगदी वेगळा आहे आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर असे दिसते की हे मासे हसत आहेत.
हा व्हिडिओ X वर @buitengebieden नावाच्या खात्यावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखोवेळा पाहिलं आहे. माशांच्या अशा वागण्याने लोकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलं आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट करत आहेत आणि या व्हिडीओला शेअर देखील करत आहेत.
