पृथ्वीपासून किती दूर आहे ग्रह
सायकी लघुग्रह पृथ्वीपासून 50 लाख किलोमीटर अंतरावर आहे, तिथं प्रकाश पोहोचण्यासाठी 31 मिनिटं लागतात. नासाचं सायकी मिशन सहा वर्षांत तिथे पोहोचेल. सायकीच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ सुमारे 165,800 चौरस किलोमीटर आहे. ते तमिळनाडू राज्यापेक्षा सुमारे 35,000 चौरस किलोमीटर जास्त आहे.
इंटरनेटशिवाय Netflix वर चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता, फक्त करा हे काम!
advertisement
एक अमूल्य खजिना
सायकीवर सोनं किती आहे या विषयावर बरंच काही लिहिलं गेलंय. त्याची किंमत काय आहे? तिथं असलेल्या सोन्याचं प्रमाण पृथ्वीच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त असेल, असं म्हटलं जातंय. ते सोनं पृथ्वीवर आणलं तर प्रत्येकाला सोन्याने मढवता येऊ शकतं, असं म्हटलं जातं.
नासाला का आहे रस?
या लघुग्रहावर मोहीम पाठवण्याच्या नासाच्या निर्णयामागचं कारण खास आहे. लघुग्रहांमध्ये कार्बन, पाणी आणि इतर घटक असतात. ते सूर्यमालेत ग्रह तयार बनताना तयार झालेले असतात. यामध्ये धातू नसतात. त्यामुळे अशा लघुग्रहांमधला धातू कुठून आला, याबद्दलच्या तपासातून अनेक रहस्यं उघड होतील. इथून पृथ्वीवर सोनं कसं आणता येईल हे शोधण्यासाठी यानंतर नासा पुन्हा अशी मोहीम राबवू शकते.
शास्त्रज्ञांना काय वाटतंय?
खगोलशास्त्रज्ञांना या लघुग्रहामध्ये खूप रस आहे कारण तिथं सोन्यासह अनेक धातू आहेत. शास्त्रज्ञांना वाटतंय, की ते ग्रहांच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात निघालेल्या धातूपासून बनलेलं असावं.
सोनं आणणं अवघड
काही अंदाजानुसार, 140 मैल रुंद लघुग्रह 16 सायकीवर 10,000 क्वाड्रिलियन डॉलर किमतीचं लोखंड, निकेल आणि सोनं आहे. सायकी हा एखाद्या ग्रहाचा उघडा धातूचा तुकडा असू शकतो. त्याने आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात टक्कर झाल्यामुळे त्याचा खडकाळ बाह्य स्तर गमावलेला असू शकतो. नासाच्या मते, सायकी कदाचित खडक आणि धातूच्या मिश्रणाने बनला असावा. त्यात धातूचं प्रमाण 30% ते 60% आहे. या लघुग्रहावरून सोनं कधी पृथ्वीवर आणता येईल का, असा विचार फक्त कल्पनेतच होऊ शकतो, असंही म्हटलं जातंय. ते सोनं पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात आलं तरी सोन्याचं महत्त्वही कमी होईल.
