TRENDING:

केस ओढले, कानशिलात लगावली आणि फाईट... 1 तरुणींचा फ्री स्टाइल WWE, व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड

Last Updated:

सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थीत सुरु असताना अचानक दोन मुलींचं रस्त्यावर जोरदार भांडण सुरू झालं. एवढंच नव्हे तर परिस्थिती इतकी बिघडली की पोलिसांनाही मध्ये पडावं लागलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी भांडणं होणं ही नवी गोष्ट नाही. भारतात लोकांना भांडणं पाहायला तर खूप आवडतात. म्हणजे भांडणं पाहाणाऱ्यांबद्दल असं देखील म्हटलं जातं की या लोकांनी कितीही उशीर झाला तरी लोक भांडण पाहण्यासाठी नक्कीच वेळ काढतात. 2 मिनिट का होईना पण नक्कीच थांबतात. पण कधी कधी अशी भांडणं एवढं टोकाची होतात की ती पाहाणाऱ्याला पण कधीकधी भीती वाटते.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

नैनीतालच्या रामनगर परिसरात असाच एक प्रकार घडला आणि त्याने सगळ्यांचे लक्ष वेधले. सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थीत सुरु असताना अचानक दोन मुलींचं रस्त्यावर जोरदार भांडण सुरू झालं. एवढंच नव्हे तर परिस्थिती इतकी बिघडली की पोलिसांनाही मध्ये पडावं लागलं.

भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

अमर उजालाच्या वृत्तानुसार हा प्रकार रामनगरमधील भवानिगंज भागात गुरुवारी (२६ सप्टेंबर) घडला. या भांडणाचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर पोहोचला आणि जोरदार व्हायरल झाला.

advertisement

व्हिडिओमध्ये चार मुली दिसतात, पण खरी भांडणं तर दोन जणींतच होती. पीच रंगाचा टॉप घातलेली मुलगी आणि लाईट ब्राऊन टी-शर्टमधली दुसरी मुलगी यांच्यात असं काही भांडण रंगलं जे टीव्हीवरील WWE पेक्षा कमी नव्हतं. केस ओढणे, कानशिलात, मुक्का अशी चांगलीच झटापट झाली. बाकीच्या दोन मुलींनी मधे पडण्याचा प्रयत्न केला तरीही भांडण थांबेनासं झालं. पण तेव्हाच पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजतो आणि त्या दोघांमधील भांडण कमी होताना दिसतं.

advertisement

शेवटी पोलिस गाडीतून उतरल्यानंतर एका कर्मचाऱ्याने दोघींना वेगळं केलं. कोतवाल अरुणकुमार सैनी यांनी सांगितलं की, पोलिसांनी मुलींना शांत केलं आणि घरी पाठवलं. पण एवढ्या मोठ्या गदारोळामागचं खरं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे मुलींमध्ये हा एवढा टोकाचा वाद का आणि कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाही.

advertisement

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया मिळाल्या. कुणी म्हणालं, “मुलींचं भांडण म्हणजे थेट अॅक्शन मूव्ही" तर दुसऱ्याने लिहिलं, “फ्री लाईव्ह WWE…तिकीट नको"

काहींनी तर याला “प्युअर सिनेमा" म्हणत टोले लगावले.

अशा घटना अलिकडे वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील खाटू श्याम मंदिराबाहेर दोन महिलांनी काठीने एकमेकींवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मंदिरात देणग्या गोळा करण्यावरून वाद झाला आणि तो चक्क मारामारीपर्यंत गेला.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
केस ओढले, कानशिलात लगावली आणि फाईट... 1 तरुणींचा फ्री स्टाइल WWE, व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल