TRENDING:

देशातलं एकमेव गाव जिथे कुणीही खात नाही मटण, पीत नाही दारू, काय आहे हा प्रकार?

Last Updated:

प्रत्येक समाजातील लोक याठिकाणी राहतात. यामध्ये बहुतांश राजपूत समाजाचा समावेश आहे. अनेक पिढ्यांपासून अत्यंत कठोरपणे या परंपरेचे पालन केले जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कुंदन कुमार, प्रतिनिधी
अनोख्या गावाची कहाणीS
अनोख्या गावाची कहाणीS
advertisement

गया : अनेकांना मांसाहार करायला आवडते. तर काही जण दारूही पितात. पुरुषांसोबतच महिलाही अगदी आजकालच्या तरुणींमध्येही मद्यपानाचे प्रमाण दिसून येते. प्रत्येक गाव, प्रत्येक शहरात तुम्हाला विविध जातीचे लोक तुम्हाला मांसाहार तसेच मद्यपान करताना दिसले असतील. यातच आज आम्ही तुम्हाला अशी एक चांगली आणि तितकीच सकारात्मक बातमी सांगणार आहोत, जे वाचून तुम्हालाही खरंच आश्चर्य होईल तसेच आनंदही होईल.

advertisement

भारतामध्ये एक गाव असे आहे ज्याठिकाणी सर्वजण 100 टक्के शाकाहारी आहेत. याठिकाणी मटण, मासे, दारूचे सेवन करण्यास पूर्णपणे मनाई आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की हे गाव नेमकं कोणतं आहे, तर हेच आपण आज जाणून घेऊयात.

हे गाव बिहारच्या गया जिल्ह्यातील वजीरगंज परिसरात आहे. या गावाचे नाव बिहिआइन असे आहे. या गावाला शाकाहारी गाव असेही म्हटले जाते. या गावाची संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झालेले आहे.

advertisement

या गावात फक्त पूजा अर्चना किंवा धार्मिक महिन्यातच नव्हे तर याठिकाणी मांसाहार आणि दारूचे सेवन न करणे अनेक पिढ्यांपासून बंद आहे. गावात ब्रह्म बाबाचे मंदिर आहे. त्यांच्या कोपामुळे आजपर्यंत येथील लोक मांस, मासे किंवा दारूचे सेवन करत नाहीत.

गया जिल्ह्यातील या वैष्णवी गावाची चर्चा सर्वत्र होते. याठिकाणी 40 घरांची लोकसंख्या आहे. प्रत्येक समाजातील लोक याठिकाणी राहतात. यामध्ये बहुतांश राजपूत समाजाचा समावेश आहे. अनेक पिढ्यांपासून अत्यंत कठोरपणे या परंपरेचे पालन केले जात आहे.

advertisement

या लोकांनी सोने अजिबात वापरू नये, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान, महत्त्वाची माहिती..

जर कुणी मांसाहार किंवा दारू सेवन करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीच्या घरासोबत दु:खद घटना घडते. त्यांचे कुटुंब वाढत नाही. तसेच या भीतीने गावातील लोक मांस, मासे याला स्पर्शही करत नाहीत. विशेष फक्त गावातील लोक या परंपरेचे पालन गावातच नाही तर गावाबाहेरही करतात. ज्या-ज्याठिकाणी राहतात त्या सर्व ठिकाणी या परंपरेचे पालन केले जाते.

advertisement

गावात नववधू आल्यावर तिलाही या परंपरेचे पालन करावे लागते. तिला लग्नापूर्वीच या परंपरेबाबत सांगितले जाते. तसेच जर एखाद्या व्यक्तीने चूकून दारू, मांस किंवा मासे याचे सेवन केले तर त्याला गावाबाहेर अंघोळ केल्यावरच गावात प्रवेश दिला जातो.

extra marital affair : बायकोचे विवाहबाह्य संबंध, नवऱ्याने लावले घरात कॅमेरे, धक्कादायक घटना..

याबाबत गावात अनेक कहाण्या आहेत. गावकऱ्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी एका व्यक्तीच्या अंगात ब्रह्म बाबा आले होते. तसेच त्यांनी यावेळी अट ठेवली होती की, गावात मटण, मासे, दारू, कोणत्याही प्रकारचा मांसाहार बंद केल्यावरच मी गावात विराजमान होईल. यानंतर सर्वांनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि तेव्हापासून याचे पालन केले जात आहे.

पहिल्या पिकाचा लागतो ब्रह्माबाबांचा नैवेद्य

एकदा गावातील एका व्यक्तीने बकरा कापण्याचा प्रयत्न केला होता. तसेच हत्याराने अनेकवेळा डोके कापण्याचा प्रयत्न केला. मात्र, बकऱ्याला काहीच झाले नाही. त्यामुळे याला ब्रह्माची शक्ती आणि देवाची इच्छा समजून लोकांनी मांसाहार करणे बंद केले. गावात वसलेल्या ब्रह्माबाबांची ख्यातीही दूरदूरपर्यंत आहे. याठिकाणी लोक विवाह व इतर मनोकामना मागण्यासाठी येतात. गावात नवीन पीक काढल्यानंतर सर्वात आधी ब्रह्माबाबांना नैवेद्य दाखवला जातो, असेही स्थानिक सांगतात.

मराठी बातम्या/Viral/
देशातलं एकमेव गाव जिथे कुणीही खात नाही मटण, पीत नाही दारू, काय आहे हा प्रकार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल