हा व्हिडीओ एका कुत्र्याशी संबंधीत आहे. ज्यामध्ये एक कुत्रा स्वत:शीच खेळण्यासाठी एक युक्ती लावतो आणि अगदी मनमोकळेपणाने खेळत असतो. त्याला असं पाहून तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल.
असं म्हणतात की घरी प्राणी असले की त्यांचं वागणं आणि त्यांच्याकडे असलेली पॉझिटीव्ह एनर्जी आपला मुड फ्रेश करते. या व्हिडीओतील कुत्र्याचं वागणं पाहून देखील तुम्हाला असंच वाटेल.
advertisement
खरंतर या कुत्र्यासोबत खेळायला कुणीही नव्हतं म्हणून मग तो बॉल सोबत खेळण्याची युक्ती शोधतो. हा कुत्रा पुलावरुन पाण्याच्या प्रवाहात आपला बॉल टाकतो आणि मग धावत जाऊन तो बॉल घेऊन येतो. कुत्रा धावत जाई पर्यंत बॉल पाण्यामुळे थोडा पुढे आलेला असतो, ज्यामुळे कुत्र्याला ते पकडणं सोप्पं होतं.
कुत्र्याचं हे वागणं फारच क्युट आहे. त्याला असं खेळताना पाहून तुम्हाला आनंद होईलच, शिवाय त्याच्या बुद्धीचं तुम्ही कौतुक कराल.
@ramblingsloa नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 15 सेकंद या व्हिडीओला लोकांनी खूपच पसंती दाखवली आहे. लोका हा व्हिडीओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करत आहेत.
