कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी सांगितलं की, आग्रा येथील तरुणीचं सहा महिन्यांपूर्वी मथुरा येथील तरुणाशी लग्न झालं होतं. नवरा गवंडी आहे. वीस दिवसांपूर्वी तिने पतीला लाल लिपस्टिक आणण्यास सांगितलं होतं. पतीला महिलांच्या सौंदर्य उत्पादनांबद्दल माहिती नव्हती. लाल रंगाऐवजी त्याने गडद मरून रंगाची लिपस्टिक खरेदी केली.
advertisement
पत्नीने लिपस्टिक परत करण्यास सांगितल्यावर पतीने ती लिपस्टिक ठेव आणि दुसरी लिपस्टिकही आणू असं सांगितलं. मात्र, पतीने पतीला सल्ला दिला की कमी कमाई असल्याने पैशांची उधळपट्टी करू नको. पुढे हे प्रकरण वादात बदललं. नवरा तिथून कामासाठी निघून गेला. तर, बायको सामान बांधून आई-वडिलांच्या घरी गेली.
यानंतर तिने पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत तक्रार केली. हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे निकालासाठी पाठवण्यात आलं. लिपस्टिकवरून झालेल्या भांडणाची माहिती पत्नीने समुपदेशकाला दिली. समुपदेशकाने पत्नीला समजावून सांगितलं की, पतीने अनावश्यक खर्चासाठी नव्हे तर प्रेमापोटी दुसरी लिपस्टिक घेण्याबाबत बोललं होतं. समजावून सांगितल्यानंतर पती-पत्नी दोघेही एकत्र राहण्यास तयार झाले.
