advertisement

नवरदेवाने हद्दच केली! रात्रभर वाट पाहत होती नवरी; अर्ध्या रस्त्यातून परत गेली वरात, समोर आलं अजब कारण

Last Updated:

लग्नाची वरात परत गेल्यानंतर वधू प्रियांकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीत वधूने वराकडील लोक तसंच नवरदेवावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

लग्नातील अजब घटना (प्रतिकात्मक फोटो)
लग्नातील अजब घटना (प्रतिकात्मक फोटो)
लखनऊ : लग्नाचं एक अजब प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. यात वधू आणि वर पक्षातील वाद इतका वाढला की नवरदेव अर्ध्या रस्त्यातूनच वरात घेऊन आपल्या घरात परतला. इकडे नवरीकडील लोक लग्नाची सगळी तयारी करून नवरदेव आणि वरातीची वाट बघत होते., तर नवरदेव अर्ध्या रस्त्यातून परत गेला होता. त्यानंतर दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये निराशा पसरली. लग्नाची वरात परत गेल्यानंतर वधू प्रियांकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीत वधूने वराकडील लोक तसंच नवरदेवावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. घटना यूपीच्या उन्नावमधील आहे.
फतेहपूर चौरासी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुझइयां गावात हळदी समारंभानंतर तयार होऊन लग्नाच्या वरातीची वाट पाहत बसलेल्या नववधूच्या आनंदाचं निराशेमध्ये रूपांतर झालं. कारण नवरदेवाने ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याने लग्नाची वरात रस्त्यातूनच परतली. गावात वधू पक्षाचे लोक नाच-गाणी करत आनंद साजरा करत होते. लोक लग्नाची वरात येण्याची वाट पाहत होते. लग्नाची वरात न आल्याने वराच्या घरच्यांशी संपर्क साधण्यात आला तेव्हा समजलं की, लग्नाची वरात रस्त्यातूनच परतली होती आणि आता नवरदेव मंडपात येणार नव्हता.
advertisement
वरात परत जाण्यामागे दोन्ही पक्षांचे प्रमुख आणि मध्यस्थांमध्ये झालेली बाचाबाची असल्याचे सांगितले जात आहे. एका व्यवहारावरून वाद झाला आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. वाद आणि बाचाबाची झाल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दारूच्या नशेत असलेले वरातीतील लोक पोलिसांचा एक शब्दही ऐकायला तयार नव्हते. अखेर हे लग्न झालंच नाही. लग्नाची वरात परत गेल्यानंतर वधूकडील लोक लग्नात झालेला खर्च परत मागताना दिसले.
advertisement
एवढंच नाही तर वधूने पोलीस ठाण्यात जाऊन वर आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला. लग्नाची वरात हुंड्यासाठी परत नेल्याचा आरोप वधूने केला आहे. फतेहपूर चौरासी पोलीस स्टेशन हद्दीतील मुझइयां खुर्द गावात राहणाऱ्या प्रियांकाचा विवाह फतेहपूर चौरासी पोलीस स्टेशन हद्दीतील चागखेडा येथील रहिवासी प्रिन्स उर्फ ​​जयबाबू याच्यासोबत निश्चित झाला होता. मुलीच्या बाजूच्या लोकांनी सकाळपासूनच लग्नाच्या सर्व विधी पूर्ण केल्या होत्या. आता मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार असल्याची चर्चा आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
नवरदेवाने हद्दच केली! रात्रभर वाट पाहत होती नवरी; अर्ध्या रस्त्यातून परत गेली वरात, समोर आलं अजब कारण
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement