advertisement

आणीबाणीनंतर अमेरिकेत हायव्होल्टेज ड्रामा, ब्लॅकआउटमुळे 9 लाख नागरिक अंधारात; 10 हजारांजवळ उड्डाणे रद्द

Last Updated:

Massive Winter Storm: अमेरिकेच्या पूर्व आणि मध्य भागात भीषण हिवाळी वादळाने थैमान घातलं असून बर्फवृष्टी, गोठवणारा पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झालं आहे. लाखो नागरिक वीजेशिवाय आहेत, हजारो विमान उड्डाणे रद्द झाली असून अनेक राज्यांत आपत्काल जाहीर करण्यात आला आहे.

News18
News18
न्यूयॉर्क: अमेरिकेच्या पूर्व आणि मध्य भागात भीषण हिवाळी वादळाने अक्षरशः थैमान घातलं आहे. जोरदार हिमवृष्टी, गोठवणारा पाऊस आणि कडाक्याची थंडी यामुळे जनजीवन ठप्प होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत न्यू मेक्सिकोपर्यंत पश्चिमेकडील भागात 8.5 लाखांहून अधिक ग्राहक वीजेशिवाय होते, तर जवळपास 10 हजार विमान उड्डाणे रद्द करावी लागली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे वादळ अमेरिकेच्या पूर्वेकडील दोन-तृतीयांश भागावर परिणाम करणार असून, आठवडाभर बर्फवृष्टी, स्लीट, गोठवणारा पाऊस आणि जीवघेण्या थंडीची शक्यता आहे.
11 राज्यांत आपत्कालीन घोषणेला मंजुरी
या वादळाला “ऐतिहासिक” संबोधत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी 11 राज्यांमध्ये फेडरल आपत्कालीन आपत्ती घोषणेला मंजुरी दिली. यामध्ये साउथ कॅरोलिना,व्हर्जिनिया,टेनेसी,जॉर्जिया,नॉर्थ कॅरोलिना, मेरीलँड, आर्कान्सा, केंटकी, लुईझियाना, मिसिसिपी, वेस्ट व्हर्जिनिया या राज्यांचा समावेश आहे.
advertisement
“या वादळाच्या मार्गावर असलेल्या सर्व राज्यांशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. सुरक्षित रहा आणि उबदार राहा,” असा संदेश ट्रम्प यांनी Truth Social वर दिला.
अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागानुसार (DHS) आतापर्यंत 17 राज्ये आणि वॉशिंग्टन डीसी यांनी हवामान आपत्काल जाहीर केला आहे. DHS सचिव क्रिस्टी नोएम यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. “थंडी अतिशय तीव्र असणार आहे. इंधन आणि अन्नसाठा करून ठेवा. आपण हे संकट एकत्र पार करू,” असं त्या म्हणाल्या.
advertisement
वीजपुरवठा कोलमडला, आकडे वाढतच आहेत
PowerOutage.us च्या माहितीनुसार, रविवारी सकाळी (EST वेळेनुसार 8:30 वाजता) 6.7 लाखांहून अधिक ग्राहक वीजेशिवाय होते. मिसिसिपी, टेक्सास, टेनेसी आणि लुईझियाना येथे प्रत्येकी 1 लाखांपेक्षा जास्त घरांवर परिणाम झाला आहे. त्यात ही केंटकी, जॉर्जिया, व्हर्जिनिया आणि न्यू मेक्सिकोही प्रभावित झाले आहेत. वीज कंपन्यांचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.
advertisement
ऊर्जा विभागाचे आपत्कालीन आदेश
स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने (DOE) आपत्कालीन आदेश जारी केले. टेक्सासमध्ये बॅकअप वीज निर्मिती संसाधनांचा वापर करण्यास परवानगी तर मिड-अटलांटिक भागात PJM Interconnection या ग्रिड ऑपरेटरला पर्यावरणीय नियम बाजूला ठेवून अतिरिक्त संसाधने वापरण्याची मुभा दिली आहे. या निर्णयामागे ब्लॅकआउट टाळण्याचा उद्देश आहे.
‘विनाशकारी’ बर्फवृष्टीचा इशारा
नॅशनल वेदर सर्व्हिसने दक्षिण-पूर्व अमेरिकेसाठी गंभीर इशारा दिला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फ साचण्याची शक्यता आहे. “अपंग करणारे ते स्थानिक पातळीवर विनाशकारी परिणाम” होऊ शकतात. ग्रेट प्लेन्स भागात सोमवारी विक्रमी थंडी आणि धोकादायक वाऱ्यामुळे गारठा जाणवेल, असा अंदाज आहे.
advertisement
विमानसेवा ठप्प
रविवारी 9,990 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द
शनिवारीही 4,000 हून अधिक फ्लाइट्स रद्द
Delta, United, JetBlue यांसारख्या मोठ्या एअरलाइन्सनी आधीच अनेक उड्डाणे रद्द केली असून, प्रवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अटलांटा, न्यूयॉर्क, बोस्टनसह अनेक विमानतळांवर मोठा परिणाम दिसून येत आहे.
डेटा सेंटर्सनाही धोका
Dominion Energy या कंपनीने सांगितलं की, व्हर्जिनियातील बर्फवृष्टीचा अंदाज खरा ठरल्यास, हा कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या हिवाळी घटनांपैकी एक ठरू शकतो. या भागात जगातील सर्वात मोठ्या डेटा सेंटर्सचा समूह आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
आणीबाणीनंतर अमेरिकेत हायव्होल्टेज ड्रामा, ब्लॅकआउटमुळे 9 लाख नागरिक अंधारात; 10 हजारांजवळ उड्डाणे रद्द
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement