धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदा देओल भावंड एकत्र, बहिणींवर वडिलांप्रमाणे माया करताना दिसला सनी, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला. बॉर्डर 2 रिलीजनंतर सनी देओल, ईशा देओल, अहाना देओल पहिल्यांदा एकत्र दिसले.
दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांसाठी आणि चाहत्यांसाठी खास दिवस आहे. धर्मेंद्र यांना केंद्र सरकारकडून मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला. तर दुसरीकडे धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल आणि धर्मेंद्र - हेमा मालिनी यांच्या मुलगी ईशा आणि आहाना एकत्र दिसले. धर्मेंद्र यांच्या निधानानंतर ईशा आणि आहाना पहिल्यांदाच सनी देओलबरोबर दिसले. तिघांना एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
23 जानेवारी 2026 रोजी सनी देओलचा बॉर्डर 2 हा सिनेमा रिलीज झाला आहे. अनुराग सिंह यांचं दिग्दर्शन तयार झालेल्या या सिनेमात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाच्या रिलीजनंतर मुंबईत एक खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला सनी देओलला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या सावत्र बहिणी ईशा देओल आणि अहाना देओल यांनी हजेरी लावली होती.
advertisement
( Dharmendra : 'ही-मॅन'च्या अभिनय प्रवासाचा गौरव! धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर )
या स्क्रीनिंगदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल आपल्या दोन्ही बहिणींसोबत पपाराझींसमोर उभा राहून पोज देताना दिसतो. काही क्षणांनंतर तो ईशा आणि अहानाला आत पाठवतो आणि स्वतः एकट्याने फोटो क्लिक करतो. वडिलांच्या निधनानंतर बहिणी ईशा आणि आहानावर वडिलांप्रमाणे प्रेम, माया करताना सनी देओल दिसला. या छोट्या पण भावनिक क्षणाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
advertisement
advertisement
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओल, ईशा देओल आणि अहाना देओल पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्या कुटुंबीयांनी मुंबईत प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. या सभेला बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. याशिवाय धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या घरी शोकसभा आयोजित केली होती. नंतर दिल्लीमध्येही हेमा मालिनी यांनी आपल्या दोन्ही मुलींसोबत शोकसभा घेत धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 10:49 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदा देओल भावंड एकत्र, बहिणींवर वडिलांप्रमाणे माया करताना दिसला सनी, VIDEO







