IND vs NZ : 357 दिवसानंतर मिळाली विकेट, टीम इंडियाच्या स्टार बॉलरचे दिवस अखेर फिरले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडने दिलेलं 154 रनचं आव्हान भारताने फक्त 10 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं.
गुवाहाटी : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडने दिलेलं 154 रनचं आव्हान भारताने फक्त 10 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने अगदी सहज विजय मिळवला. अभिषेकने 20 बॉलमध्ये नाबाद 68 आणि सूर्यकुमार यादवने 26 बॉलमध्ये नाबाद 57 रनची खेळी केली. या विजयासोबतच भारताने 5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारतीय बॉलर्सनी न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 153/9 वर रोखलं. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर हार्दिक पांड्या-रवी बिष्णोई यांना 2-2 विकेट मिळाल्या. हर्षित राणालाही एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले. अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना विश्रांती देण्यात आली, त्यांच्याऐवजी जसप्रीत बुमराह आणि रवी बिष्णोई यांची टीममध्ये निवड झाली.
advertisement
रवी बिष्णोई याला तब्बल एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट मिळाली आहे. 357 दिवसांनंतर रवी बिष्णोई याला यश मिळालं आहे. जवळपास वर्षभर रवी बिष्णोई टीम इंडियातून बाहेर होता, त्याचा शेवटचा सामना फेब्रुवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध होता. त्या सामन्याच्या 357 दिवसांनंतर रवी बिष्णोईला भारतीय टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.
रवी बिष्णोईने या सामन्यात मार्क चॅपमनला 12 रनवर आऊट करत पहिली विकेट मिळवली. त्यानंतर त्याने ग्लेन फिलिप्सला 48 रनवर आऊट केले, ही त्याची सामन्यातील दुसरी विकेट होती. बिष्णोईने त्याच्या पुनरागमनाच्या सामन्यात चार ओव्हरमध्ये फक्त 18 रन देऊन दोन विकेट घेतल्या. बिश्नोईच्या दमदार बॉलिंगमुळे न्यूझीलंडला 153 रनवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रवी बिष्णोईने एका वर्षानंतर मिळालेल्या संधीचा फायदा घेतला आहे.
advertisement
रवी बिष्णोईचं करिअर
रवी बिष्णोईने 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी फक्त एकच वनडे सामना खेळला आहे. पण, त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडे प्रभावी राहिले आहेत. बिष्णोईने त्याच्या 43 सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 63 विकेट घेतल्या आहेत. 2024 मध्ये त्याने टीम इंडियासाठी एकूण 22 विकेट घेतल्या, पण त्यानंतर 2025 च्या सुरुवातीला त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले.
Location :
Guwahati [Gauhati],Kamrup Metropolitan,Assam
First Published :
Jan 25, 2026 11:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : 357 दिवसानंतर मिळाली विकेट, टीम इंडियाच्या स्टार बॉलरचे दिवस अखेर फिरले!








