TRENDING:

'वो स्त्री है, कुछ भी करत सकती है...' घरात बिबट्या घुसला म्हणून महिलेनं पाय बांधले, Video सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय

Last Updated:

व्हिडिओमध्ये एक बिबट्या दिसतो, ज्याला पायाला दोरी बांधलेली आहे आणि शरीरावर कपडा टाकलेला आहे. दावा केला जातोय की हा बिबट्या एका घरात घुसला होता आणि त्या घरातील महिलेनं धाडस दाखवत, त्याला सुरक्षित पद्धतीने पकडलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर लोक सतत काही ना काही व्हिडिओ स्क्रोल करत असतात आणि आपला वेळ घालवतात, मनोरंजन करतात. प्राणी, निसर्ग, मनुष्य किंवा मजेशीर प्रसंग लोकांना हे पाहायला खूप आवडतं. काही वेळा लोकांना प्राण्यांचे कधी गोड कधी थरारक व्हिडीओ पाहायला देखील आवडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये सगळ्यात धोकादायक शिकारी प्राणी आहे, पण यामध्ये त्याची अशी अवस्था झाली आहे की तुम्हाला त्याची कीव येईल.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

व्हिडिओमध्ये एक बिबट्या दिसतो, ज्याला पायाला दोरी बांधलेली आहे आणि शरीरावर कपडा टाकलेला आहे. दावा केला जातोय की हा बिबट्या एका घरात घुसला होता आणि त्या घरातील महिलेनं धाडस दाखवत, त्याला सुरक्षित पद्धतीने पकडलं.

व्हिडिओ शेअर करताना caption असा होता "घरात बिबट्या घुसला, बायकोनं दोरीनं बांधला." यानंतर मजेशीर अंदाजात लिहिलेलं 'विचार करा, पत्नीने बिबट्याची अशी हालत केली तर पतीला काय करावं लागेल?"

advertisement

या दृश्याने प्रेक्षक थक्क झाले आहेत. हे लोक महिलेच्या साहसाचे कौतुक करत आहेत. तर एका युजरनं मजेत लिहिलं वो स्त्री है, 'कुछ भी कर सरकी है.'

व्हिडिओ पाहणाऱ्यांनी कमेंट्समध्ये आश्चर्य व्यक्त केलं आहे. काहींना हा व्हिडिओ थोडा घाबरवणारा वाटला, तर काहींना मनोरंजक आणि आश्चर्यकारक वाटला. अनेकांनी स्त्रीच्या धैर्याचे कौतुक केले आणि सोशल मीडियावर तिच्या साहसाची चर्चा सुरू झाली.

advertisement

हा व्हिडिओ एक्स प्लेटफॉर्मवर @HasnaZaruriHai या अकाउंटवरून शेअर केला गेला आहे आणि सध्या तो वारंवार पाहिला जातोय. अद्याप तरी व्हिडिओ कधी आणि कुठे बनवला गेला याची माहिती नाही, पण लोक चकित झाले आहेत हे नक्की.

advertisement

या व्हिडिओने हे दाखवून दिलंय की, स्त्री किती धैर्यवान असू शकते. जंगलातील प्राण्यांशी सामना करणे सर्वसामान्य माणसासाठी शक्य नसते, पण योग्य तयारी आणि धैर्य दाखवल्यास अशा परिस्थितीवर मात करता येते. सोशल मीडियावर लोकं हे दृश्य पाहून प्रेरणा घेत आहेत, कौतुक करत आहेत आणि अनेकांनी अशा साहसी स्त्रियांची माहिती इतरांपर्यंत पोहोचवली आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
'वो स्त्री है, कुछ भी करत सकती है...' घरात बिबट्या घुसला म्हणून महिलेनं पाय बांधले, Video सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल