डासांची फॅक्ट्री म्हटल्यावर ती कुठे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. ही फॅक्ट्री आहे ब्राझीलमध्ये. इथलं क्युरिटिबा हे आता जगातील सर्वात मोठं डास उत्पादन केंद्र बनलं आहे. इथं दर आठवड्याला सुमारे 100 दशलक्ष डासांची अंडी तयार होतात. पण हे सामान्य डास नाहीत. या डासांमध्ये वोल्बाचिया बॅक्टेरिया आहेत. वोल्बाचिया हा एक नैसर्गिकरित्या आढळणारा जीवाणू आहे जो 60% पेक्षा जास्त कीटकांमध्ये आढळतो. तो डेंग्यू, झिका आणि चिकनगुनियासारख्या विषाणूंना डासांच्या शरीरात पसरण्यापासून रोखतो.
advertisement
कसं शक्य आहे? म्हातारा होऊन पुन्हा तरुण होतो हा जीव, काय आहे त्याचं रहस्य?
वोल्बाचिया संक्रमित डास उच्च जोखीम असलेल्या भागात सोडले जातात जिथं ते जंगली डासांसह प्रजनन करतात. त्यानंतर डासांच्या पुढील पिढीला वोल्बाचिया बॅक्टेरियाने सुरक्षित केलं जातं. इतर विषाणूंशी लढण्यासाठी संरक्षणात्मक जीवाणूंनी संक्रमित होतात. डासांमध्ये इंजेक्शन दिल्याने ते कीटकांमध्ये विषाणू पसरण्यापासून रोखतात.
ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने आधीच आठ शहरांमध्ये ही पद्धत लागू केली आहे. पाच दशलक्ष लोकांना संरक्षण देण्यात आलं आहे. नितेरोईमध्ये डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये 69% घट झाली आहे. वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्राम, ओस्वाल्डो क्रूझ फाउंडेशन आणि पराना इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील हा प्रकल्प प्राणघातक आजारांविरुद्धच्या लढाईत मदत करेल.