पैसा, नोकरी,गाडी आणि घर सगळं काही मिळणार! 13 फेब्रुवारीपासून राहू-शुक्र-सूर्याची जबरदस्त युती, या 5 राशींचे नशीब चमकणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संयोगांना विशेष महत्त्व दिले जाते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत अनुकूल ग्रहयोग निर्माण झाले, तर आयुष्यात प्रगती, संपत्ती आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता वाढते.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संयोगांना विशेष महत्त्व दिले जाते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत अनुकूल ग्रहयोग निर्माण झाले, तर आयुष्यात प्रगती, संपत्ती आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता वाढते. येत्या काळात शनीच्या राशीत घडणारा एक दुर्मीळ ग्रहसंयोग अनेक राशींसाठी भाग्यवर्धक ठरणार आहे. सूर्य, राहू आणि शुक्र यांच्या एकत्र येण्याने तयार होणारा त्रिग्रही योग ५ राशींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडवू शकतो.
कुंभ राशी
ज्योतिषशास्त्रानुसार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याच राशीत आधीपासूनच राहू आणि शुक्र विराजमान आहेत. त्यामुळे सूर्य-राहू युतीतून ग्रहण योग तयार होणार असून, सूर्य-शुक्र संयोगामुळे शुक्रादित्य योग देखील निर्माण होईल. हे तिन्ही ग्रह एकत्र आल्याने एक शक्तिशाली त्रिग्रही योग घडेल. हा योग १ मार्च २०२६ पर्यंत प्रभावी राहणार असून, त्यानंतर शुक्र मीन राशीत प्रवेश करेल आणि ही युती समाप्त होईल. मात्र, या काळात ५ राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. त्रिग्रही योगामुळे कौटुंबिक आनंद वाढेल आणि घरगुती वातावरण सुखकर राहील. घर, वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदीचे योग संभवतात. प्रभावशाली व्यक्तींशी ओळखी वाढतील. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक प्रगती होण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा ग्रहयोग दिलासादायक ठरणार आहे. कुटुंबातील काही काळापासून चालू असलेल्या समस्या सुटण्याच्या मार्गावर जातील. मानसिक तणाव कमी होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या कमी होतील आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जीवनात सकारात्मक ऊर्जा जाणवेल.
advertisement
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात सुधारणा होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल आणि एखादी दीर्घकाळची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि समाधानाची भावना निर्माण होईल.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीसाठी उत्तम संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना नफ्यात वाढ अनुभवायला मिळेल.
advertisement
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग आर्थिक मजबुती घेऊन येणार आहे. बचतीत वाढ होईल आणि भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. नातेसंबंधातील गैरसमज दूर होतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. पुरस्कार, सन्मान किंवा पदोन्नतीची शक्यता नाकारता येत नाही.
(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 6:51 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
पैसा, नोकरी,गाडी आणि घर सगळं काही मिळणार! 13 फेब्रुवारीपासून राहू-शुक्र-सूर्याची जबरदस्त युती, या 5 राशींचे नशीब चमकणार





