advertisement

आज ८ फेब्रुवारीचा दिवस ५ राशींसाठी ठरणार सर्वात भाग्यशाली! हातात पैसाच पैसा येणार

Last Updated:

Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या सतत बदलणाऱ्या हालचालींचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो.

Astrology News
Astrology News
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांच्या सतत बदलणाऱ्या हालचालींचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो आणि त्या ग्रहाच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या नशिबात चढ-उतार दिसून येतात. आज रविवार 8 फेब्रुवारी रोजी काही खास ग्रहयोग निर्माण होत असून त्याचा सकारात्मक प्रभाव काही निवडक राशींवर दिसणार आहे.
रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. सूर्य हा आत्मबल, नेतृत्व, आत्मविश्वास आणि यशाचा कारक ग्रह आहे. सूर्याच्या शुभ प्रभावामुळे काही राशींसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी ठरणार आहे. राजयोगांच्या निर्मितीमुळे काम, पैसा, आरोग्य आणि कौटुंबिक आयुष्यात समाधान मिळण्याची दाट शक्यता आहे. जाणून घेऊया, कोणत्या राशींसाठी आज  ‘लकी डे’ ठरणार आहे.
वृषभ रास
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी रविवारचा दिवस सकारात्मक उर्जेने भरलेला असेल. सूर्यदेवाच्या कृपेने रखडलेली कामे पूर्ण होतील आणि तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील आणि अचानक येणाऱ्या अडचणी टळतील. मानसिक शांतता लाभेल, त्यामुळे आत्मविश्वासाने पुढील निर्णय घ्याल.
advertisement
कर्क रास
कर्क राशीसाठी आज दिवस अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे. देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहील. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील आणि जुनी कर्जे फेडण्याचा मार्ग मोकळा होईल. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत, जे फायदेशीर ठरू शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. एकाग्रतेने काम केल्यास मोठे यश मिळू शकते.
advertisement
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस समाधानकारक ठरेल. मागील काही दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. अडथळे दूर होऊन नवीन संधी उपलब्ध होतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल, ज्यामुळे मन हलके होईल. आरोग्य चांगले राहील आणि उत्साह वाढलेला जाणवेल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी रविवार प्रगतीचा दिवस ठरणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि नवीन योजना आखण्याची प्रेरणा मिळेल. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहील. मात्र मानसिक शांततेसाठी पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. प्रवासाचे योग देखील संभवतात.
advertisement
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आशादायी ठरेल. नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. तुम्ही भावनिक निर्णयांकडे अधिक झुकाल, मात्र मित्रांचा योग्य सल्ला उपयोगी ठरेल. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. परदेश प्रवासाचे संकेतही मिळू शकतात. तुमच्या वाणीतील गोडवा लोकांना आकर्षित करेल आणि सामाजिक संबंध अधिक दृढ होतील.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही) 
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
आज ८ फेब्रुवारीचा दिवस ५ राशींसाठी ठरणार सर्वात भाग्यशाली! हातात पैसाच पैसा येणार
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement