Daily Numerology : आज अचानक तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे मिळतील
- Published by:Prachi Dhole
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 30 जून 2024 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. ऑफिसमध्ये तुम्ही असं काही काम कराल, ज्यामुळे तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. वडिलांचा सल्ला घेऊन पैसे गुंतवा. आर्थिक फायदा होईल. तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं नियोजन करू शकतो. आजचा दिवस खूप आनंददायी असेल.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. अचानक तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे मिळतील. व्यवसायाच्या दृष्टिने आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन मार्ग खुले होतील. कुटुंबासाठी आज घरी तुम्ही एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
advertisement
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी पैसे नवीन कामात गुंतवा. ते भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचं राहील. कुटुंबासाठी दिवस आनंदात जाईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा प्लॅन करू शकता. एकंदरीत आजचा दिवस सर्वच बाबतीत खूप चांगला आहे
advertisement
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणीचा ठरेल. तुमची नियोजित कामं अचानक बिघडतील, काळजी घ्या. आज तुमच्या मुलाची तब्येत अचानक बिघडू शकते. कौटुंबिक समस्याही वाढतील. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकतं. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ राहू शकता. जोडीदाराशी उद्धटपणे वागू शकता, काळजी घ्या. आज एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करा.
advertisement
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, तुमच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता, यासाठी तुम्ही बहिणीचा किंवा मुलीचा सल्ला घेतला तर तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
advertisement
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. मात्र तुमच्याकडे पैशांची कमतरता भासेल. तुमचे पैसे कुठेतरी अडकतील. त्यामुळे तुम्ही मानसिक तणावात राहाल. आज कुटुंबातील सदस्यांशी मतभिन्नता असू शकते. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारचे कठोर शब्द वापरू नका, फायद्याचं ठरेल. तुमच्या जोडीदारासोबतच थोडा वेळ घालवा. तुमच्या नजीकच्या भविष्यासाठी ते चांगले ठरेल.
advertisement
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. तुमच्या सध्याच्या कामात अडथळे येतील, ज्यामुळे तुमचा आनंद कमी होईल. आरोग्याच्या दृष्टिने स्वतःची काळजी घ्या. कारण तुम्हाला पायाची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी दिवस सामान्य आहे. जोडीदाराशी काही वाद होऊ शकतात, काळजी घ्या. अशा परिस्थितीत शांत राहा. रागावर नियंत्रण ठेवा. उपाय म्हणून सूर्याला अर्घ्य द्या, फायदा होईल.
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, तुमच्यासाठी आजचा दिवस अडचणीचा ठरेल. तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. अनावश्यक खर्च वाढेल. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. तुमच्या आईची तब्येत अचानक बिघडू शकते. कुटुंबात त्रासदायक वातावरण असेल. तुम्हाला अचानक राग येऊ शकतो. अशा परिस्थितीत संयम बाळगा, फायद्याचं ठरेल.
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आर्थिक दृष्टिकोनातूनही आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसेही मिळतील. आज तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल. आज काही नवीन काम सुरू करायचं असेल तर दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदाराशी आपुलकीने वागा, फायदेशीर ठरेल. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी सर्व बाबतीत खूप चांगला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 29, 2024 9:22 PM IST


