2026 मध्ये गुरुचं 2 राशींमध्ये गोचर, मेषसह 'या' राशींच्या लोकांचं चमकणार भाग्य; पण 3 राशींच्या लोकांना राहावं लागणार अलर्ट

Last Updated:

ज्योतिषशास्त्रानुसार, 'देवगुरू बृहस्पती' हे सुख, समृद्धी, ज्ञान आणि भाग्याचे कारक मानले जातात. नवीन वर्ष 2026 हे गुरु ग्रहाच्या संक्रमणाच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारी ठरणार आहे.

News18
News18
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार, 'देवगुरू बृहस्पती' हे सुख, समृद्धी, ज्ञान आणि भाग्याचे कारक मानले जातात. नवीन वर्ष 2026 हे गुरु ग्रहाच्या संक्रमणाच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारी ठरणार आहे. या वर्षात गुरु ग्रह केवळ राशी परिवर्तनच करणार नाही, तर आपल्या उच्च राशीत प्रवेश करून अनेक राशींचे नशीब पालटणार आहे. 2 जून 2026 रोजी गुरु ग्रह मिथुन राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशीत म्हणजेच 'कर्क' राशीत प्रवेश करेल. त्यानंतर वर्षाच्या उत्तरार्धात, 31 ऑक्टोबर 2026 रोजी तो 'सिंह' राशीत प्रवेश करेल. तब्बल 12 वर्षांनंतर गुरु कर्क राशीत येत असल्याने अनेक राशींसाठी 'राजयोग' निर्माण होणार आहे.
मेष - प्रगतीचा सुवर्णकाळ: मेष राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे संक्रमण करिअरमध्ये मोठी झेप घेण्यास मदत करेल. तुमच्या कार्यक्षेत्रात आदर वाढेल आणि रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील आणि परदेश प्रवासाचे योग जुळून येतील.
वृषभ - आर्थिक सुबत्ता: वृषभ राशीच्या जातकांना भौतिक सुखांची प्राप्ती होईल. कुटुंबातील कलह दूर होतील. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल.
advertisement
मिथुन - नशिबाची साथ: उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याचे दाट संकेत आहेत. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील.
सिंह - नेतृत्व आणि प्रतिष्ठा: 31 ऑक्टोबरनंतर गुरु तुमच्याच राशीत येणार असल्याने तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. राजकारण किंवा सरकारी कामात असलेल्यांना मोठे पद मिळू शकते.
advertisement
तूळ आणि वृश्चिक - तूळ राशीच्या लोकांसाठी उत्पन्नात वाढ होईल, तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे गोचर 'विपरीत राजयोग' तयार करेल, ज्यामुळे अचानक धनलाभ आणि शत्रूंवर विजय मिळेल.
धनु - भाग्योदय: धनु राशीचा स्वामी स्वतः गुरु असल्याने, हा बदल तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि कुटुंबात एखादा मंगल कार्य पार पडेल.
advertisement
'या' राशींनी राहावे सावध
गुरूचे हे गोचर कुंभ, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी काही आव्हाने घेऊन येऊ शकते.
कुंभ : शनीची साडेसाती आणि गुरुची प्रतिकूल स्थिती यामुळे आरोग्य आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.
मकर आणि मीन: कामात अडथळे येऊ शकतात आणि आर्थिक व्यवहारात फसवणूक होण्याची शक्यता आहे. या काळात कोणताही मोठा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
2026 मध्ये गुरुचं 2 राशींमध्ये गोचर, मेषसह 'या' राशींच्या लोकांचं चमकणार भाग्य; पण 3 राशींच्या लोकांना राहावं लागणार अलर्ट
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement