पुण्यात नियतीचा अजब खेळ! स्टुडिओतून हसतमुखाने बाहेर पडलेल्या लक्ष्मीबाईंचा 'तो' फोटो ठरला अखेरचा

Last Updated:

नातेवाईकांची भेट घेऊन त्या नखाते चौकातील एका स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी गेल्या होत्या. पण काहीच वेळात...

महिलेचा अपघातात मृत्यू (AI Image)
महिलेचा अपघातात मृत्यू (AI Image)
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नखाते चौकात रस्ता ओलांडत असताना एका भरधाव हायड्रोलिक क्रेनने धडक दिल्याने ७७ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (३१ डिसेंबर) दुपारी तीनच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. वर्षाच्या शेवटच्या दिवशीच महिलेला मृत्यूने गाठले.
लक्ष्मीबाई खाणेकर (वय ७७, रा. ताथवडे) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी रहाटणी भागात आल्या होत्या. नातेवाईकांची भेट घेऊन त्या नखाते चौकातील एका स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी गेल्या होत्या. तिथून परतत असताना रस्ता ओलांडताना उजव्या बाजूने आलेल्या हायड्रोलिक क्रेनने (क्र. MH-14 LG-4227) त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, लक्ष्मीबाई क्रेनच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच अंत झाला. महिलेनं स्टुडिओमध्ये काढलेला तो फोटो शेवटचा ठरला
advertisement
घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक शंतनू निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या चौकात हा अपघात झाल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. तसेच वाहतुकही विस्कळीत झाली होती.
वाहतूक पोलिसाला मारहाण
दुसऱ्या एका घटनेत पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांना अटकाव करणे एका पोलीस हवालदाराच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धायरी फाटा चौकात 'ट्रिपल सीट' प्रवास करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांनी कारवाईचा राग मनात धरला. त्यांनी पोलीस हवालदाराला भरचौकात मारहाण केली आणि त्यांचा युनिफॉर्म फाडला. याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात नियतीचा अजब खेळ! स्टुडिओतून हसतमुखाने बाहेर पडलेल्या लक्ष्मीबाईंचा 'तो' फोटो ठरला अखेरचा
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement