Virar Name History : विरारचं द्वारकाधीश करण्याची मागणी, पण VIRAR हे नाव कसं पडलं माहितीये? फक्त नाव नाही मोठा इतिहास
- Published by:Priya Lad
Last Updated:
Virar Station Name History : विरार नावाची उत्पत्ती नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा ठोस पुरावा नसला तरी विविध ऐतिहासिक संदर्भ आणि दंतकथांमधून त्याची ओळख स्पष्ट होते. विरारचा इतिहास हा केवळ शहराचा नाही, तर कोकण आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
पुढील स्टेशन विरार... अगला स्टेशन विरार... नेक्स्ट स्टेशन विरार... दररोज मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या कानात दररोज पडणारं, कित्येकांच्या तोंडावर असलेलं हे नाव... महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वसलेलं विरार आज मुंबई महानगर प्रदेशातील एक महत्त्वाचं उपनगर म्हणून ओळखलं जातं. वेगाने वाढणारं शहर, लोकसंख्येची घनता, रेल्वे स्थानक आणि गजबजलेलं शहरी जीवन पाहता विरार नेहमीच चर्चेत असतं.
advertisement
अशा या विरारचं नाव बदलण्याची मागणी आता होऊ लागली आहे. विराराचं नाव बदलून द्वारकाधीश करावं अशी मागणी होते आहे. पण विरार हे नाव कसं पडलं, हे तुम्हाला माहिती आहे का? विरार या नावामागे एक दीर्घ, रंजक आणि अनेक टप्प्यांतून घडलेला इतिहास दडलेला आहे. विरार नावाच्या उत्पत्तीबाबत एकमताने मान्य केलेला ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. मात्र इतिहासकार, अभ्यासक आणि स्थानिक दंतकथा यांवरून काही शक्यता मांडल्या जातात.
advertisement
सम्राट अशोकाच्या काळात म्हणजे इ.स. पूर्व 260 च्या सुमारास सोपारा म्हणजे आताचं नालासोपारा हे एक मोठं व्यापारी केंद्र होते, जिथे बौद्ध विहार बांधले गेले होते. 'महिकावतीची बखर' या ग्रंथामध्ये या जागेचा उल्लेख 'विहार' असा आहे. काळाच्या ओघात आणि लोकांच्या बोलण्यातून विहारचं विरार झालं असावं, असं मानलं जातं.
advertisement
advertisement
advertisement
विरारच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पोर्तुगीज सत्ताकाळ. 1534 साली वसई म्हणजे तेव्हाचं बासीन पोर्तुगीजांच्या ताब्यात गेलं. विरार हा वसई प्रांताचा एक भाग होता. पोर्तुगीजांनी या भागात चर्च, ख्रिस्ती वस्ती, जमीन महसूल पद्धती आणि शेतीच्या नव्या पद्धती सुरू केल्या. आजही परिसरात दिसणारी काही चर्च, गावांची नावे आणि वास्तुरचना त्या काळाची साक्ष देतात.
advertisement
advertisement
1739 मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळात चिमाजी आप्पा यांनी वसई जिंकली आणि पोर्तुगीज सत्तेचा अंत झाला. त्यानंतर विरार मराठा साम्राज्यात सामील झाला. गावपातळीवर पाटील, देशमुख, कुलकर्णी व्यवस्था अस्तित्वात होती. ब्रिटिश काळात विरार हा मुख्यतः शेती आणि मासेमारीवर अवलंबून असलेला भाग होता. रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर विरारचं महत्त्व वाढू लागलं.
advertisement
वैतरणा नदीच्या काठी तुंगा पर्वताच्या पायथ्याशी एकविरा देवीचं एक मोठं मंदिर होतं. या देवीला समर्पित विराआर तीर्थ म्हणजे एकविरा तीर्थ देखील होतं. देवीच्या नावावरून या जागेला विरार हे नाव मिळालं, असं काहीजण मानतात. विरा म्हणजे एकविरा देवी आणि आर म्हणजे जागा किंवा किनारा मिळून विरार एकविरा देवीची जागा म्हणजे विरार हे नाव तयार झालं, असं मानलं जातं.
advertisement
प्राचीन ग्रामीण भाषेत ओहोळाला वीरा म्हणत. विरारच्या पश्चिमेला अनेक ओहोळ होते. वीराचे गाव म्हणून विरार हे नाव रूढ झालं असावं, असाही एक मतप्रवाह आहे. काही अभ्यासकांच्या मते, या भागाचं प्राचीन नाव विराट किंवा विराटनगर असावं. काळानुसार भाषा, उच्चार आणि बोलीभाषेतील बदलांमुळे विराट या शब्दाचा अपभ्रंश होऊन विरार असा शब्द तयार झाला असावा. भारतातील अनेक शहरांची नावं अशाच पद्धतीने कालांतराने बदललेली दिसतात.
advertisement
स्वातंत्र्यानंतर मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे विरार झपाट्याने विकसित झाला. आज विरार हे निवासी, व्यापारी आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचं शहर बनलं आहे. प्राचीन इतिहास, पोर्तुगीज वारसा, मराठ्यांचा प्रभाव आणि आधुनिक शहरीकरण यांचा संगम म्हणजे आजचा विरार होय. (सर्व फोटो : गुगल, सोशल मीडिया, इंडियन रेल्वे इन्फो)







