Kalyan News : कल्याण-उल्हासनगर प्रवासात खोळंबा! महत्त्वाचा पूल वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग काय?
Last Updated:
Kalyan Latest News : कल्याण आणि त्या आसपास असलेल्या शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही काही निमित्ताने उल्हासनगर किंवा विठ्ठलवाडीला जाणार असाल तर ही बातमी पाहा.
कल्याण : कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरील विठ्ठलवाडी स्मशानभूमीजवळ असलेला पूल नव्याने बांधण्यासाठी बंद करण्यात आला आहे. पुल कोणत्या कारणांसाठी बंद करण्यात आलेला असून किती दिवस वाहतूक बंद असणार आहे.या बाबत जाणून घ्या सविस्तर अपडेट.
किती दिवस राहणार विठ्ठलवाडी पूल बंद?
मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल 31 मेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन कल्याण वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आले आहे.
या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात त्यावर पाणी साचते आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच या ठिकाणी विठ्ठलवाडी ते शहाडला जोडणारा उड्डाणपूल एमएमआरडीए मार्फत बांधला जात आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
खड़ेगोळवली भागातून विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन किंवा श्रीराम चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी आता आनंद दिघे उड्डाणपुलावरून सम्राट चौक मार्गे जावे लागेल. स्मशानभूमी चौकाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेतून उल्हासनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी आनंद दिघे पुलावरून वालधुनी मार्गाचा वापर करावा.
हलक्या वाहनांसाठी शहराच्या आतील पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. कोळशेवाडी पोलिस स्टेशन किंवा विठ्ठलवाडी स्टेशन पूर्वेकडे जाण्यासाठी काटेमानिवली पुलाखालून हनुमाननगर, चिंचपाडा रोड आणि 100 फूट रस्ता वापरण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
advertisement
कल्याणकडे येताना कोणता पर्यायी मार्ग वापरावा?
उल्हासनगरहून कल्याणकडे येताना वाहनचालकांनी श्रीराम चौकातून वालधुनी मार्गे आनंद दिघे पुलावरून पुढे यावे लागेल. काही काळ वाहतुकीत बदल राहणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 9:14 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : कल्याण-उल्हासनगर प्रवासात खोळंबा! महत्त्वाचा पूल वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग काय?







