Shocking : व्हॅलेन्टाईन्सच्या आधी प्रियकराचं भयानक कृत्य; तरुणीला ओढत नेले अन् पेट्रोल...; मुलुंड स्थानकातील घटना
Last Updated:
Mulund Railway Station Incident : मुलुंड रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेने संपूर्ण मुंबई हादरुन गेलेली आहे. जिथे प्रियकरानेच प्रेयसीसोबत भयानक कृत्य केलेल आहे.
मुंबई : काही दिवसांपासून जगभर व्हॅलेन्टाईन्स डे साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक प्रियकर आपल्या प्रेयसीला खुष करण्यासाठी विविध भेट वस्तू आणि आकर्षक गोष्टी करत असतो. अशातच व्हॅलेन्टाईन्स डेच्या आधी मुंबईतून एक थरकाप उडवणारी घटना समोर आलेली आहे. जिथे रागाच्या भरात प्रियकराने प्रियसीसोबत भयानक कांड केलेले आहे.
नराधम प्रियकराने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा
प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्याच्या रागात तरुणाने तिचा पाठलाग करून तिला मुलुंड रेल्वेस्थानकात नेत आत्मदहनाची धमकी दिली. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी मुलुंडमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी घाटीपाडा परिसरात राहत असताना तिची पुरव मनोहर गोरे (वय21) याच्याशी ओळख झाली होती. 2024 मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र वारंवार होणाऱ्या वादांमुळे डिसेंबर 2027 पासून तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडला होता.
advertisement
नातं संपवल्यावरही पीछा सोडायला तयार नाही
त्यामुळे तिच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर नेहमी पाठलाग करायचा. त्यानुसारच बुधवारी ती कामासाठी घराबाहेर पडताच गोरे तिच्या शॉपबाहेर आला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देताच तिचा हात पकडून 20 ते 25 फूट अंतरावर असलेल्या मुलुंड रेल्वेस्थानकात नेले. तिचा मोबाइल तपासला. त्यानंतर त्याच्या खिशातून पेट्रोलने भरलेली बॉटल काढून स्वतःच्या अंगावर ओतून घेत, सोबत नाही राहिली तर स्वतला जाळून घेण्याची धमकी दिली.
advertisement
अनर्थ घडता घडता राहिला
तरुणीने आरडाओरडा करताच नागरिक जमताहेत पाहून तो पळून गेला. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे.-
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 8:55 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : व्हॅलेन्टाईन्सच्या आधी प्रियकराचं भयानक कृत्य; तरुणीला ओढत नेले अन् पेट्रोल...; मुलुंड स्थानकातील घटना






