advertisement

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 3 तासांत घृष्णेश्वर दर्शन; वेरुळला VIP बंद, वाहतुकीत बदल, पाहा सविस्तर

Last Updated:

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी वेरूळच्या ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला घृष्णेश्वरात 3 तासांत दर्शन; व्हीआयपी बंद, कडेकोट सुरक्षा आणि वाहतुकीत बदल
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला घृष्णेश्वरात 3 तासांत दर्शन; व्हीआयपी बंद, कडेकोट सुरक्षा आणि वाहतुकीत बदल
‎छत्रपती संभाजीनगर: येत्या 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री असून या दिवशी देशभरातील शिवमंदिरांत भाविकांची मोठी गर्दी असते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ या ठिकाणी असणारे श्री घृष्णेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी देशभरातून शिवभक्त येत असतात. भाविकांना श्री घृष्णेश्वराचे दर्शन लवकर घेता यावे, कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने आणि मंदिर प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे.
यंदा 3 तासांत दर्शन घडेल अशी व्यवस्था केली आहे. मागील वर्षी दर्शनासाठी 4 तास लागत होते. यंदा हा वेळ एका तासाने कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. महाशिवरात्र रविवारी आल्याने भाविक वाढण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. त्यामुळे 34 बॅरिकेड्स आणि 65 सीसीटीव्हीद्वारे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
‎घृष्णेश्वर मंदिराचे सचिव राजेंद्र कौशिके यांनी माहिती दिली की, महाशिवरात्रीला राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. रात्री 12 वाजता अभिषेक होईल. त्यानंतर लगेच दर्शनाला सुरुवात केली जाईल. 24 तासांहून अधिक काळ भाविकांना दर्शनलाभ व्हावा, असे नियोजन आम्ही केले आहे.
advertisement
‎जिल्हा प्रशासनाने वाहतुकीत बदल केले आहेत. शनिवारी (14 फेब्रुवारी) रात्री 8 वाजेपासून ते सोमवारी (16 फेब्रुवारी) सकाळी 8 वाजेपर्यंत वेरुळ गावातील मुख्य रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने वेरूळ येथील भगवान महावीर चौक ते मालोजीराजे भोसले चौक हा रस्ता पूर्णपणे बंद राहील.
‎गर्दीच्या पार्श्वभूमीवर यंदा व्हीआयपी दर्शन, स्पेशल पास किंवा प्राधान्य प्रवेश पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. भाविकांना एकाच रांगेतून दर्शन घ्यावे लागणार आहे. प्रत्येक भाविकासाठी दर्शन निःशुल्क आहे. मंदिर विश्वस्त तसेच प्रशासन यांच्या वतीने लवकर दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. रांगेत उभे राहिल्यास 3 तासांत दर्शन करून बाहेर पडता येईल.
advertisement
‎असे आहेत वाहतुकीत बदल
‎कन्नड, वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहने कन्नड, वेरूळ, कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा, शरणापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.
‎छत्रपती संभाजीनगर, दौलताबाद, खुलताबाद, वेरुळ मार्गे कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरूळ मार्गे कन्नडकडे जातील.
‎फुलंब्री, सुलतानपूर, खुलताबाद, वेरूळ मार्गे कन्नडकडे जाणारी वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वरझडी, कसाबखेडा फाटा, वेरूळ मार्गे कन्नडकडे जातील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला 3 तासांत घृष्णेश्वर दर्शन; वेरुळला VIP बंद, वाहतुकीत बदल, पाहा सविस्तर
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement