advertisement

Jalna News: कीर्तनाला गेल्यावर 'त्यांनी' डाव साधला, बेडरुमध्ये घुसले अन्..., जालन्यात खळबळ

Last Updated:

Jalna News: जालना शहरातील गुन्हेगारीचे लोण ग्रामीण भागात देखील पसरत आहे. शेतातील विद्युत मोटारी, गोठ्यात बांधलेले जनावरे चोरून नेण्याच्या घटनांत मागील काही दिवसांत वाढ झाली आहे.

Jalna News: कीर्तनाला गेल्यावर 'त्यांनी' डाव साधला, बेडरुमध्ये घुसले अन्..., जालन्यात खळबळ (Ai Photo)
Jalna News: कीर्तनाला गेल्यावर 'त्यांनी' डाव साधला, बेडरुमध्ये घुसले अन्..., जालन्यात खळबळ (Ai Photo)
जालना: गेल्या काही दिवसांत जालना शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांत मोठी वाढ झाली आहे. चोरी, खंडणी आणि खून यांसारख्या घटना घडत आहेत. कोठाळा येथील दोन कुटुंब कीर्तनासाठी बाहेरगावी गेल्यावर घरफोडी झाली. चोरट्यांनी 4 लाखांपेक्षा जास्त ऐवज चोरून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
कोठाळा येथील ज्ञानेश्वर सुभाष गुळवणे (32) हे आपल्या कुटुंबासह कोठाळा खुर्द येथे राहतात. गावातील हनुमान मंदिरासमोर अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. बुधवारी रात्री सुमारे 9 ते 11 वाजेदरम्यान त्यांचे संपूर्ण कुटुंब कीर्तनाला गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. कीर्तनानंतर काही वेळाने त्यांची आई व मुले घरी आली. त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
advertisement
चोरट्यांनी ज्ञानेश्वर गुळवणे यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. चोरीची माहिती मिळताच, ज्ञानेश्वर गुळवणे यांनी देखील घराकडे धाव घेतली. बेडरूममध्ये कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी 4 लाख 20 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
advertisement
दरम्यान, जालना शहरातील गुन्हेगारीचे लोण ग्रामीण भागात देखील पसरत आहे. शेतातील विद्युत मोटारी, गोठ्यात बांधलेले जनावरे चोरून नेण्याच्या घटनांत मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Jalna News: कीर्तनाला गेल्यावर 'त्यांनी' डाव साधला, बेडरुमध्ये घुसले अन्..., जालन्यात खळबळ
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement