advertisement

स्लीपर बसमध्ये हैदराबाद-पुणे प्रवास; पती शेजारी झोपलेला असतानाच मुंबईतील नराधमाचं पुण्याच्या महिलेसोबत घाणेरडं कृत्य

Last Updated:

संबंधित महिला ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता काचीगुडा (हैदराबाद) येथून एका खासगी ट्रॅव्हल्सने हडपसरच्या दिशेने येत होती. ती आणि तिचे पती स्लीपर सीटवर झोपलेले होते

बसमध्ये महिलेचा विनयभंग (AI Image)
बसमध्ये महिलेचा विनयभंग (AI Image)
पुणे: हैदराबादहून पुण्याकडे येणाऱ्या एका खासगी स्लीपर बसमध्ये धक्कादायक घटना घडली. यात एका महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित महिला आपल्या पतीसोबत प्रवास करत असतानाच हा प्रकार घडला. मात्र, हडपसर पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या 24 तासांत आरोपीला बेड्या ठोकून न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता काचीगुडा (हैदराबाद) येथून एका खासगी ट्रॅव्हल्सने हडपसरच्या दिशेने येत होती. ती आणि तिचे पती स्लीपर सीटवर झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास बसमध्ये असलेल्या निशीत कुमार यशवंत सिंग (वय ४७, रा. मिरा रोड, मुंबई) याने पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आरोपीच्या या अश्लील कृत्यामुळे महिला दचकून जागी झाली आणि तिने प्रसंगावधान राखून या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले.
advertisement
पोलिसांची 'सुपरफास्ट' कारवाई
पुण्यात पोहोचल्यानंतर पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पीडितेने दिलेला व्हिडिओ पुरावा म्हणून ग्राह्य धरत पोलिसांनी आरोपी निशीत कुमारला अटक केली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी केवळ गुन्हाच नोंदवला नाही, तर २४ तासांच्या आत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.
advertisement
प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्या वागणुकीवर कोणाचे नियंत्रण आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
स्लीपर बसमध्ये हैदराबाद-पुणे प्रवास; पती शेजारी झोपलेला असतानाच मुंबईतील नराधमाचं पुण्याच्या महिलेसोबत घाणेरडं कृत्य
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement