inspiring story : किराणा दुकानदाराच्या मुलाची कमाल, जर्मनीच्या कंपनीकडून मिळालं तब्बल 26 लाख रुपयांचं पॅकेज

Last Updated:

कार्तिक गुप्ता असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील राकेश गुप्ता हे किराणा दुकान चालवतात. तर त्याची आई गृहिणी आहे. अशा या अत्यंत साधारण परिस्थितीतूनही त्याने मोठे यश मिळवले आहे.

कार्तिक गुप्ता
कार्तिक गुप्ता
अंजलि सिंह राजपूत, प्रतिनिधी
लखनऊ : आज आई-वडील अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत मुलांना शिकवतात आणि मुलेही त्यांच्या या मेहनतीची, कष्टाची जाणीव ठेवतात आणि मोठं यश मिळवतात. अशा या अत्यंत कठीण परिस्थितीत मिळवलेले यश हे सर्वांसाठी, समाजातील तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरते. आज अशाच एका किराणा दुकान चालवणाऱ्या व्यक्तीच्या मुलाची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहेत.
कार्तिक गुप्ता असे या तरुणाचे नाव आहे. कार्तिक गुप्ता या तरुणाचे वडील राकेश गुप्ता हे किराणा दुकान चालवतात. तर त्याची आई गृहिणी आहे. तसेच भाऊ हा मार्केटिंगच्या क्षेत्रात नोकरी करतात. अशा या अत्यंत साधारण परिस्थितीतूनही त्याने मोठे यश मिळवले आहे. कार्तिक गुप्ता या तरुणाला तब्बल 26 लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी लागली आहे. तो लखनऊ विद्यापीठातील बी. टेक (ece) या विद्याशाखेचा विद्यार्थी आहे. एका जर्मनीच्या आयटी कंपनीकडून त्याला तब्बल 26 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले.
advertisement
IIT Bombay मधून शिक्षण, आता United Nations कडून सर्वात मोठा लष्करी सन्मान, कोण आहेत मेजर राधिका सेन?
त्याच्या या यशानंतर लोकल18 च्या टीमने त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने बोलताना सांगितले की, त्याच्या या यशानंतर त्याचे कुटुंबीय अगदी भावूक झाले. त्याने याठिकाणी 6 महिन्याची इंटर्नशिप केली होती. त्यानंतर आता त्याच कंपनीत त्याला नोकरी मिळाली आहे. त्याचे शालेय शिक्षण हे केंद्रीय विद्यालयातून झाले. माझा पहिला पगारा मिळाल्यावर आई-वडिलांना मी एक स्पेशल गिफ्ट देईल, असे तो म्हणाला. तसेच त्याची ड्रीम कार फोर्ड मस्टँग खरेदी करणार असल्याचे त्याने सांगितले.
advertisement
तर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक आलोक कुमार राय यांनी सांगितले की, कार्तिकच्या या यशाने विद्यापीठाचे नाव मोठे केले आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांसाठीही तो प्रेरणास्त्रोत बनला आहे. कठीण परिश्रम आणि समर्पण असेल तर कोणतेही लक्ष्य प्राप्त करता येते, हे त्याने सिद्ध करुन दाखवले आहे, असे ते म्हणाले.
लोक म्हणायचे या मुलीच्या कुंडलीत दोष, पण तिने कमाल करुन दाखवली, आधी बनली डॉक्टर, नंतर घेतला मोठा निर्णय
दरम्यान, प्लेसमेंट सेल इन्चार्ज डॉ. हिमांशू पांडे यांनी सांगितले की, कार्तिकने जर्मनीमधील एआय कंपॅटिबल सर्च इंजिन कंपनी क्वाड्रंटने घेतलेली लेखी परीक्षा आणि टेक्निकल मुलाखत उत्तीर्ण केली. यानंतर आता त्याची सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या पदासाठी वार्षिक 26 लाख रुपयांच्या पॅकेजवर त्याची निवड झाली आहे.
मराठी बातम्या/करिअर/
inspiring story : किराणा दुकानदाराच्या मुलाची कमाल, जर्मनीच्या कंपनीकडून मिळालं तब्बल 26 लाख रुपयांचं पॅकेज
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement