लोक म्हणायचे या मुलीच्या कुंडलीत दोष, पण तिने कमाल करुन दाखवली, आधी बनली डॉक्टर, नंतर घेतला मोठा निर्णय

Last Updated:

जेव्हा काही समस्या येऊ लागल्या, तेव्हा या मुलीचे कुटुंबीय ज्योतिषींकडे गेले. या दरम्यान अनेक लोकांनी मुलीला ती मांगलिक असल्याचे म्हटले, तर कुणी तिच्या कुंडलीत दोष असल्याचे म्हटले. मात्र, मुलीच्या मनात वेगळंच काही सुरू होतं.

डॉ. भावना
डॉ. भावना
ज्योती रानी, प्रतिनिधी
पलवल : एका कुटुंबाची इच्छा होती की, त्यांच्या मुलीने डॉक्टर बनावं. यासाठी मुलीनेही प्रचंड मेहनत घेतली. मात्र, जेव्हा काही समस्या येऊ लागल्या, तेव्हा कुटुंबीय ज्योतिषींकडे गेले. या दरम्यान अनेक लोकांनी मुलीला ती मांगलिक असल्याचे म्हटले, तर कुणी तिच्या कुंडलीत दोष असल्याचे म्हटले. मात्र, मुलीच्या मनात वेगळंच काही सुरू होतं.
या मुलीने या सर्वांचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले आणि त्यादृष्टीने अभ्यासही सुरू केला आणि ज्योतिष शास्त्रात तिला इतकी आवड निर्माण झाली की, ती मुलगी स्वत: ज्योतिषी बनली. विशेष म्हणजे या मुलीने आपल्या कुटुंबीयांचे स्वप्न पूर्ण करत आधी डेंटिस्टचे शिक्षण पूर्ण करत डॉक्टरही बनली.
advertisement
डॉ. भावना यांची ही कहाणी आहे. त्या हरयाणातील पलवल येथील रहिवासी आहेत. त्यांनी डेंटिस्ट बनवल्यावर त्या क्षेत्रात करिअर न करता ज्योतिषी बनण्याचा विचार केला. ज्या लोकांना चुकीचा सल्ला दिला जातो, त्या लोकांना योग्य मार्ग दाखवता येईल, हेसुद्धा या मागचे एक कारण होते. ज्योतिषी बनण्यासाठी त्यांनी दिल्लीतील भारतीय विद्या भवन याठिकाणी प्रवेश घेतला. यानंतर त्या इंटरनॅशनल ट्रेडर्स यांच्याजवळही त्या राहिल्या. त्यांनी तंत्र-मंत्राचेही शिक्षण घेतले आणि आज त्या प्रसिद्ध ज्योतिषी आहेत.
advertisement
IIT Bombay मधून शिक्षण, आता United Nations कडून सर्वात मोठा लष्करी सन्मान, कोण आहेत मेजर राधिका सेन?
आज त्यांच्याजवळ फरिदाबाद, गुरुग्राम आणि दिल्ली येथून दूरदूरवरुन लोकं येतात. भावना यांनी सांगितले की, त्यांनी डॉक्टर बनावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. यामुळे कुटुंबीयांच्या इच्छेनुसार, त्या डॉक्टर बनल्या. मात्र, त्यांचे मन ज्योतिषशास्त्रात रमले होते. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनीही सहकार्य केले. आज डॉ. भावना या पलवलमध्ये एक तरुण ज्योतिषी बनल्या आहेत.
advertisement
अशाप्रकारच्या समस्या येतात -
डॉ. भावना यांनी सांगितले की, त्या झूम मीटिंग, फोनवरही लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्येचे समाधान सांगतात. सर्वात जास्त कॉल लव्ह लाइफशी संबंधित समस्यांबाबत येतात. तसेच लोक आपला लकी नंबर काय आहे, हे विचारण्यासाठीही कॉल करतात, अशी माहिती त्यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
लोक म्हणायचे या मुलीच्या कुंडलीत दोष, पण तिने कमाल करुन दाखवली, आधी बनली डॉक्टर, नंतर घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement