उन्हाचा कहर, सर्वच हैराण, अशा परिस्थितीत नेमकं काय करावं, डॉक्टरांनी दिला अत्यंत महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

बदलत्या हवामानात सकाळ-संध्याकाळ उष्ण वारे वाहत आहेत. काही जणांना ही हवा आवडू शकते. मात्र, तुम्ही यामुळे आजारी पडू शकतात. या वाऱ्यात असलेल्या विषाणूंमुळे फ्लू, खोकला, सर्दी, घसादुखी आणि ताप वाढत आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
गौरव झा, प्रतिनिधी
मधुबनी : देशात सर्वत्र तापमान वाढल्याने सर्वांना हा त्रास असह्य असा होत आहे. लोकांना या उकाड्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक जण उष्माघाताने आजारी पडत आहेत. तसेच या उष्माघातामुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबद्दल लोकल 18 च्या टीमने तज्ञांशी चर्चा केली. नेमकं ते काय म्हणाले हे जाणून घेऊयात.
advertisement
बदलत्या हवामानात सकाळ-संध्याकाळ उष्ण वारे वाहत आहेत. काही जणांना ही हवा आवडू शकते. मात्र, तुम्ही यामुळे आजारी पडू शकतात. या वाऱ्यात असलेल्या विषाणूंमुळे फ्लू, खोकला, सर्दी, घसादुखी आणि ताप वाढत आहे. बेनिपट्टी उपविभाग रुग्णालयाचे अधीक्षक एमबीबीएस डॉ. सुशील यांनी ही माहिती दिली.
मुलाला ATM सापडलं अन् काढले 25 हजार रुपये, घरी येऊन बापाला सांगितलं तर…
लोकल18 शी बोलताना ते पुढे म्हणाले की, इन्फ्लूएंझा, RSV आणि H1N1 सारखे आजारही वाढत आहेत. अशा वातावरणात लहान मुलांची तसेच घरातील मोठ्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. नोकरी करणाऱ्यांनी दिवसातून किमान 3 वेळा ORS चे सेवन करणे आवश्यक आहे. हे उष्णतेची लाट आणि उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे.
advertisement
बदलत्या हवामानामुळे आजारी होण्याचा धोका सर्वात जास्त आहे. त्यामुळे यापासून बचावासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे महत्त्वाचे आहे. यासाठी कमीत कमी 5 ते 6 लीटर पाणी ठेवावे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्यासोबत डिटॉक्स वॉटर, हर्बल टी आणि नारळपाणी पिऊ शकतात. असे केल्याने शरारातून विषारी तत्त्व बाहेर निघण्यास मदत होते. याशिवाय, हायड्रेटेड राहिल्याने घसा ओलसर ठेवण्यास मदत होईल. यामुळे बॅक्टेरिया कमी होतील आणि प्रतिकारशक्ती वाढेल.
advertisement
ब्लू टिकच्या मोहाला बळी पडली सेलिब्रेटी, थेट instagram account हॅक, नेमकं काय घडलं?
या सर्व परिस्थितीत डॉ. सुशील यांनी हा सल्ला दिला की, जर खरंच गरज असेल आणि अत्यंत महत्त्वाचं काम असेल तर घराबाहेर निघालेव. पान, सुपारी आणि मादक पदार्थांचे सेवन करणे हानिकारक होऊ शकते. त्यामुळे जितके शक्य होईल, या सर्वांपासून बचाव करावा. गेल्या काही दिवसांत उष्णतेच्या या लाटांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण आजारीही पडले आहेत. त्या आरोग्याशी संबंधित काहीही समस्या असल्यास डॉक्टरांशी किंवा जवळच्या हॉस्पिटलशी संपर्क साधावा, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
उन्हाचा कहर, सर्वच हैराण, अशा परिस्थितीत नेमकं काय करावं, डॉक्टरांनी दिला अत्यंत महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement