MUM vs KAR : मयंक आग्रवालने नाकात दम केला, पण मुंबईने 120 मिनिटात फिरवली मॅच, BKC वर चालली सचिनने सांगितलेली रणनिती!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai vs Karnataka : कर्नाटकने पहिल्या दिवसअखेर 2 विकेट्स मगावून 110 वर धावा केल्या होत्या. त्यानंतर आज मॅचची सुरूवात झाल्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केलं.
Mumbai vs Karnataka, Ranji Trophy : मुंबईच्या शरद पवार क्रिकेट अकाडमी बीकेसी मैदानावर मुंबई आणि कर्नाटक यांच्यात रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला जात आहे. पहिल्या डावात मुंबईची बॅटिंग ऑर्डर ढेपाळल्यानंतर कर्नाटकने देखील गुडघे टेकवले आहेत. कर्नाटकने चांगली सुरूवात केल्यानंतर मुंबईने दुसऱ्या दिवशी कर्नाटकला झुंजावलं अन् 2 तासात गेम फिरवला. बीकेसीवर असं काय झालं? ज्यामुळे मुंबईने सामन्यात कमबॅक केलं? जाणून घ्या.
120 धावांवर ऑलआऊट
सामन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईचा संघ 120 धावांवर ऑलआऊट झाला. तर कर्नाटकने रनचेस करताना काल चांगली सुरुवात केली. केएल राहुल आणि मयंक आग्रवाल या दोन दोस्तांनी मुंबईला झुंजवलं अन् पहिला दिवस आपल्या नावावर केला. कर्नाटकने पहिल्या दिवसअखेर 2 विकेट्स मगावून 110 वर धावा केल्या होत्या. त्यानंतर आज मॅचची सुरूवात झाल्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केलं. कॅप्टन पेड्डिकलने देखील हत्यार टाकलं.
advertisement
कर्नाटकचा डाव 173 धावांवर गुंडाळला
कर्नाटकचा डाव पत्त्यासारखा कोसळला. मयंक आग्रवालने मुंबईला विकेट सोपवली नाही. तो झुंजत राहिला. पण दुसऱ्या बाजूने विकेट्सचा तडाखा सुरू होता. त्यामुळे कर्नाटकचा डाव 173 धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर आता मुंबईने आक्रमक सुरूवात केली असून मुंबईचे देखील दोन गडी बाद झाले आहेत. यशस्वी जयस्वाल आणि अखील हेरवाडकर यांनी 50 धावांची पार्टनरशीप केली. त्यानंतर 87-2 अशी परिस्थिती मुंबईची झाली आहे.
advertisement
पहिल्या दिवसाची हायलाईट्स - इथे पाहा
तुषार देशपांडे आणि मोहित अवस्थी
दरम्यान, कर्नाटककडे दमदार बॅटिंग लाईनअप आहे. केएल राहुल, मयंक आग्रवाल, देवदत्त पेडिक्कल आणि करून नायर यांच्या अनुभवामुळे मुंबईच्या नाकात दम केला आहे. पण तुषार देशपांडे आणि मोहित अवस्थी यांची आक्रमक मारा करत प्रत्येकी 4 विकेट्स नावावर केल्या. तर कॅप्टन शार्दुल ठाकूर याला एकच विकेट मिळाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 2:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MUM vs KAR : मयंक आग्रवालने नाकात दम केला, पण मुंबईने 120 मिनिटात फिरवली मॅच, BKC वर चालली सचिनने सांगितलेली रणनिती!








