ब्लू टिकच्या मोहाला बळी पडली सेलिब्रेटी, थेट instagram account हॅक, नेमकं काय घडलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
मुलीने अनेक मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केले आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 6.50 लाख फॉलोअर्स आहेत.
राहुल दवे, प्रतिनिधी
इंदौर : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. यामध्ये काही जणांना अल्पावधीतच प्रसिद्धी मिळते. त्यामुळे अशा सोशल मीडिया सेलिब्रेटींना सायबर गुन्हेगार फसवण्याची शक्यता अधिक असते. असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सेलिब्रेटीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करुन तिच्याकडे तब्बल 200 डॉलर्सची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
इंदूर येथून ही घटना समोर आली आहे. या ठिकाणी असलेल्या एका लहान सेलिब्रेटीचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 6 लाख 50 हजार फॉलोअर्स आहेत. ब्लू टिक मिळवण्याच्या चक्करमध्ये हॅकरने तिची प्रोफाइल हॅक केली आणि पासवर्डही बदलला. तसेच यूजरनेमही चेंज केले. यानंतर हॅकरने प्रोफाइल वापस करण्यासाठी 200 डॉलरची खंडणी मागितली. यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे ही तक्रार येताच त्यांच्या टीमने हायटेक पद्धतीने इन्व्हेस्टीगेशन करुन या लहान सेलिब्रेटीची प्रोफाईल परत मागवली.
advertisement
आईने केली होती तक्रार -
याबाबत एडीसीपी राजेश दंडोतिया यांनी माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, इंदूर येथील रहिवासी असलेल्या आवेदिका यांनी गुन्हे शाखेत आपल्या 11 वर्षांच्या मुलीचे इन्स्टाग्राम प्रोफाइल हॅक झाल्याची तसेच हॅकरने प्रोफाइल परत करण्यासाठी 200 डॉलरची खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. तक्रार मिळताच गुन्हे शाखेच्या सोशल मीडिया सेलच्या टीम तत्काळ प्रोफाइल रिकव्हर करण्यासाठी सक्रिय झाली.
advertisement
मुलगी मोहात पडली -
सोशल मीडिया सेलच्या वतीने आवेदिका यांच्या मुलीचे इंस्टाग्राम अकाउंटची पूर्ण माहिती घेतली. यावेळी अशी माहिती समोर आली की, मुलीने अनेक मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केले आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 6.50 लाख फॉलोअर्स आहेत. तिला हॅकरने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर ब्लू टिक मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला ती बळी पडली आणि तिने ईमेलद्वारे आपल्या प्रोफाइलचा पासवर्ड आणि ऑथेंटिकेशन कोड हॅकरसोबत शेअर केला.
advertisement
तुर्की देशातील सॉफ्टवेअरचा वापर -
मुलीने आपल्या प्रोफाइलचा पासवर्ड आणि ऑथेंटिकेशन कोड शेअर केल्याचा हॅकरने फायदा उचलला आणि त्याने प्रोफाइलचा पासवर्ड बदलून प्रोफाइलचे यूजर नेमही बदलले होते. हॅकरच्या बनावट ईमेलवरून गुन्हे शाखेने तपास केला तेव्हा हा हॅकर तुर्कीमधून सॉफ्टवेअर वापरत असल्याचे गुन्हे शाखेला समजले. गुन्हे शाखेने मेटा प्लॅटफॉर्मशी पत्रव्यवहार करून हॅकरच्या सर्व तपशीलांची मागणी केली. तसेच प्रोफाइल रिकव्हर करण्यासाठी तक्रारदाराच्या ईमेलवर पासवर्ड रिसेट लिंक पाठवण्याची विनंती केली. यानंतर तक्रारकर्त्या महिला आवेदिका यांच्या मुलीचे प्रोफाइल सुरक्षितपणे रिकव्हर करण्यात आले.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
May 31, 2024 2:12 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ब्लू टिकच्या मोहाला बळी पडली सेलिब्रेटी, थेट instagram account हॅक, नेमकं काय घडलं?