मुलाला ATM सापडलं अन् काढले 25 हजार रुपये, घरी येऊन बापाला सांगितलं तर...

Last Updated:

हेमराज (वय-42) यांनी आपला मुलगा हर्ष याला एटीएममधून पैसे आणायला पाठवले होते. हर्ष (वय-16) हा आपला मित्र बादल (वय-15) याच्यासोबत जय स्तंभ चौकातील इंडिया वनच्या एटीएमवर गेला. त्याठिकाणी त्याला तिथे आधीपासूनच पडलेले एक एटीएम मिळाले.

प्रेरणादायी कहाणी
प्रेरणादायी कहाणी
दीपक पांडेय, प्रतिनिधी
खरगोन : सध्याच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना समोर येत आहेत. सायबर क्राईमच्या माध्यमातूनही लोकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत एक अनोखी घटना समोर आली आहे.
प्रामाणिकता अजूनही जिवंत आहे, असा प्रत्यय एका घटनेतून समोर आला आहे. एका मुलाला एटीएम कार्ड मिळाले. त्यानंतर त्याने त्या एटीएम कार्डमधून 25 हजार 500 रुपये काढले. हे सर्व पैसे घेऊन तो घरी परतला तर त्याच्या वडिलांनी त्याला समजावले आणि एटीएम कार्डसोबत रुपये घेऊन पोलीस ठाण्यात जमा केले. या व्यक्तीचे प्रत्येक जण कौतुक करत आहे.
advertisement
ही घटना मध्यप्रदेशातील खरोगन याठिकाणी घडली. बडवाह पोलीस ठाण्यांतर्गत कुम्हार मोहल्ला येथील रहिवासी हेमराज (वय-42) यांनी आपला मुलगा हर्ष याला एटीएममधून पैसे आणायला पाठवले होते. हर्ष (वय-16) हा आपला मित्र बादल (वय-15) याच्यासोबत जय स्तंभ चौकातील इंडिया वनच्या एटीएमवर गेला. त्याठिकाणी त्याला तिथे आधीपासूनच पडलेले एक एटीएम मिळाले. त्याने दोन वेळा या एटीएमच्या माध्यमातून पिन टाकत पैसा काढण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला आणि अशाप्रकारे त्याने या सापडलेल्या एटीएम कार्डच्या मदतीने 25 हजार 500 रुपये काढले. यानंतर त्याने घरी येऊन आपल्या वडिलांना सर्व घटनाक्रम सांगितला. मात्र, त्याच्या वडिलांनी त्याला समजावले आणि पूर्ण प्रामाणिकपणा दाखवत सर्व पैसे पोलीस ठाण्यात जमा केले.
advertisement
devendra fadnavis in ayodhya : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामललाच्या दर्शनाला, अयोध्येत केली मोठी घोषणा, म्हणाले…
बडवाना पोलीस ठाण्याचे प्रमुख निर्मल श्रीवास्तव यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. योगेश यादव (वय-28) हे आपले वडील जगदीश यादव यांच्यासह बडवाह पोलीस ठाणे येथे आला होता. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास इंडियाा वनच्या एटीएमवर मिनी स्टेटमेंट घ्यायला गेला होता. मात्र, चुकून त्याचे एटीएम तिथे राहून गेले. यानंतर एका तासाने त्याला 25 हजार 500 रुपये काढल्याचा मेसेज आला. यानंतर तो एटीएमवर गेला. मात्र, त्याला त्याचे एटीएम मिळाले नाही. यानंतर त्याने याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.
advertisement
पोलिसांनी केले सन्मानित -
याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्वरित पोलीस जवानाला एटीएम चेक करण्यासाठी पाठवले गेले. सीसीटीव्ही फुटेजही काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, रात्र खूप झाली होती. पोलीस तपास करतच होते. मात्र, तितक्यात हेमराज आपला मुलगा हर्ष आणि त्याचा मित्र बादल याला सोबत घेऊन त्याठिकाणी ते एटीएम कार्ड आणि पैसे परत करायला आले आणि त्यांनी हे एटीएम कार्ड आणि पैसे परत केले. हा सर्व प्रकार पाहून उपस्थितांना आश्चर्य झाले. त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे पोलिसांनी हेमराज यांना प्रोत्साहन राशी देत सन्मानित केले.
view comments
मराठी बातम्या/देश/
मुलाला ATM सापडलं अन् काढले 25 हजार रुपये, घरी येऊन बापाला सांगितलं तर...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement