भाजपच्या महिला नेत्याने पोटच्या लेकीला केलं नराधमांच्या हवाली, अनेकदा करवला अत्याचार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भारतीय जनता पक्षाच्या एका महिला नेत्याने पोटच्या अल्पवयीन लेकीवर अनेकदा सामूहिक अत्याचार करवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या एका महिला नेत्याने पोटच्या अल्पवयीन लेकीवर अनेकदा सामूहिक अत्याचार करवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी महिलेची मुलगी अल्पवयीन आहे. असं असताना देखील आरोपी महिलेनं आपल्या मुलीला प्रियकराच्या हवाली केलं. प्रियकराने आणि त्याच्या एका साथीदाराने पीडितेवर अनेकदा सामूहिक अत्याचार केला आहे. ही घटना उघडकीस येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला नेत्यासह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. अन्य एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
बुधवारी पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आईने जानेवारीमध्ये अल्पवयीन मुलीला बाहेर फिरायला घेऊन गेली होती. तेव्हा तिच्यासोबत तिचा प्रियकर आणि फरार असलेल्या दुसरा संशयित आरोपी होता. दरम्यान, दोघांनी दारू पिऊन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर नराधमांनी तिला आग्रा, वृंदावन आणि हरिद्वार येथील हॉटेलमध्ये नेलं, जिथे अनेक वेळा लैंगिक अत्याचार करण्यात आले. घटनेची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारू, अशी धमकी देखील आरोपींनी दिली होती, असं पोलिसांनी सांगितल.
advertisement
तक्रारीनुसार, आरोपीने ज्यावेळी मुलीवर बलात्कार केला. तेव्हा प्रत्येकवेळी तिची आई घटनास्थळी उपस्थित होती. तिच्या सहमतीनेच हा अत्याचार झाला आहे. आरोपी महिला हरिद्वारमध्ये भाड्याने एक हॉटेल चालवत होती. याप्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हरिद्वारचे एसएसपी परमेंद्र डोभाल म्हणाले की, वैद्यकीय तपासणीत आरोप सिद्ध झाले आहेत.
advertisement
तक्रारदाराची पत्नी दोन वर्षांपूर्वी घरगुती वादामुळे तक्रारदारापासून वेगळी झाली. दोघंही विभक्त झाल्यानंतर आरोपी महिलेनं मुलीचा ताबा घेतला होता. पण अलीकडेच मुलगी तिच्या वडिलांकडे महिनाभर राहण्यासाठी आली होती. त्यावेळी वडिलांना तिचं बदललेलं वर्तन लक्षात आलं. त्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रसंग सांगितला. मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पीडितेचे जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत आणि पोलीस सध्या फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
Location :
Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
June 06, 2025 7:13 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
भाजपच्या महिला नेत्याने पोटच्या लेकीला केलं नराधमांच्या हवाली, अनेकदा करवला अत्याचार